Fake Doctors: गोवंडीत दोन बोगस डॉक्टर अटकेत

दोघेही गोवंडीच्या शिवाजी नगर येथील राहणारे आहेत.
Fake Doctors
Fake DoctorsPudhari
Published on
Updated on

कुर्ला: कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना सर्वसामान्य रुग्णांवर अनधिकृतरित्या उपचार करणारे राजीव रंजन (34) आणि कुबेरनाथ यादव (56) हे दोन बोगस डॉक्टर गुन्हे शाखेने गजाआड केले. दोघेही गोवंडीच्या शिवाजी नगर येथील राहणारे आहेत.

गोवंडी- शिवाजी नगर परिसरातील झोपडपट्टी भागात गेल्या काही वर्षांत अनेक बोगस डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई केली आहे. कुठल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसताना सर्वसामान्य रुग्णांवर याठिकाणी उपचार केले जात आहेत. परिणामी चुकीच्या उपचारामुळे गेल्या काही वर्षांत अनेक निष्पाप रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.

Fake Doctors
Vidhan Bhavan Fake Entry Pass: बनावट पत्रावर अधिवेशनाचे पास; 7 अटकेत

अशाच प्रकारे गोवंडी- शिवाजी नगर परिसरातील बैंगनवाडी परिसरात राजीव रंजन (34) आणि कुबेरनाथ यादव (56) हे दोन बोगस डॉक्टर वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

गुरुवारी सकाळी गुन्हे शाखेच्या पथकांनी आरोपींच्या दोन वेगवेगळ्या क्लिनिकवर छापा घातला. पोलिसांनी त्यांच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली असता, कुठल्याही प्रकारची पदवी मिळून आली नाही. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी विविध प्रकारची औषधे आणि इंजेक्शन जप्त केली असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news