मुंबई : शालेय शिक्षण विभागाने केलेल्या नियोजनामुळे येत्या शैक्षणिक वर्षात मराठी शाळांची पटसंख्या 25 टक्क्यांनी वाढणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केला. तसेच महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे बंधनकारक असून तसे न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी मराठी शाळांच्या पटसंख्येचा प्रश्न उपस्थित केला. तसेच काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले,
सर्व माध्यमांच्या, सर्व भाषिकांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जी शाळा याची अंमलबजावणी करत असेल तिच्यावर कारवाई करण्यात येईल.