Manoj Jarange Vs Eknath Shinde pudhari
मुंबई

Manoj Jarange Vs Eknath Shinde: हेडलाईन्समध्ये राहण्याची नशा झालीये... ५०० कोटींच्या आरोपावरून शिंदे गटाचा जरांगेंवर पलटवार

मनोज जरांगेंच्या या आरोपावर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी आरोप फेटाळले आहेत.

Anirudha Sankpal

Manoj Jarange Patil Vs Eknath Shinde: दसऱ्यानिमित्त बीडमधील नारायण गडावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि. २० ऑक्टोबर) उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदेंवर खळबळजन आरोप केला होता. त्यांनी ५०० कोटी रूपये मला दिले का नाही याचा खुलासा करावा असं आव्हानही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्यासपीठावरून केलं.

मनोज जरांगेंच्या या आरोपावर आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी ज्या प्रकारे मराठा मोर्चा भरकटवला त्याचप्रमाणे आताही आरोप केले जात आहे असे वक्तव्य केलं.

दिल्लीतून ५०० कोटी रूपये आणले

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन ५०० कोटी रूपये घेऊन आले त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी ते मनोज जरांगे पाटील यांना दिले असं तुम्ही भाजप नेत्यांना सांगितलं आहे अशी माहिती मिळत आहे. हे खरं आहे का याचा खुलासा करा असं आव्हान जरांगेंनी एकनाथ शिंदे यांना दिलं.

त्यानंतर आता शीतल म्हात्रे यांनी याला उत्तर दिलं असून मनोज जरांगे भरकवटत आहेत असा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, 'मनोज जरांगे पाटील सतत मीडिया आणि हेडलाईन्समध्ये राहण्याची नशा झाली आहे. कदाचित त्यामुळं त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत.

दसऱ्या मेळाव्याच्या आगोदरच का वक्तव्य?

आरोपांमध्ये तथ्य असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी पुरावे समोर ठेवावेत. या आरोपांना उत्तर देण्याची फारशी गरज नाही असं म्हणत शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे सायंकाळच्या दसरा मेळाव्यात यावर भाष्य करण्याची शक्यता कमी आहे असे सूतोवाच देत आहेत.

शीतल म्हात्रे यांनी मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले हे आधी पाहावे लागेल. त्यांना दसऱ्या मेळाव्याच्या आगोदरच असे वक्तव्य का केलं. याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. या आरोपांमागे नेमकी काय कारणे आहेत. त्यात किती तथ्य आहे. हे तपासणे महत्वाचे आहे. केवळ हेडलाईन्ससाठी आरोप केला जात आहे का हेही पाहावे लागेल.

शिंदे मेळाव्यात उत्तर देतील?

एकानथ शिंदे साहेब दसरा मेळाव्यात अनेक प्रश्नांची उत्तरे देतील. शिवसैनिकांना पक्षाची पुढील वाटचाल आणि संघटनात्मक बांधणीबाबत देखील मार्गदर्शन करणार आहेत असं देखील शीतल म्हात्रे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये यासाठी शिंदे साहेबांनी ५० टक्के मदत पाठवली आहे. पुढील आठ महिन्यात शिवसेनेकडून शेतकऱ्यांना सातत्याने मदत केली जाणार आहे. अशी माहिती म्हात्रे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT