Manoj Jarange Patil file photo
मुंबई

Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे- पाटील यांचे आंदोलन मुंबईत की अंतरवाली सराटीत !

Maratha reservation protest : राज्यस रकारने मागील वर्षी आझाद मैदानात आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करू, असा शब्द दिला होता...

पुढारी वृत्तसेवा

- मराठा क्रांती मोर्चाकडून आझाद मैदानाची पाहणी

- शनिवारी आंदोलन सुरू होण्याची शक्यता

- गतवेळच्या त्रुटी राहू नये यासाठी दक्षता

मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी मुंबईत आंदोलन केले होते. मराठा समाजाच्या काही मागण्याची राज्यसरकारने अंमलबजावणी न केल्याने पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे.

एकीकडे; जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड)येथे शनिवारी ( दि.२९) आंदोलन करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले असले तरी दुसरीकडे; मुंबईत या आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रशांत सावंत व मराठा समाज बांधवांनी आझाद मैदानाची रविवारी पाहणी केली.त्यामुळे जरांगे- पाटील यांचे आंदोलन मुंबईत होणार की अंतरवाली सराटी मध्ये होणार ? असा प्रश्न आहे.

यावेळी प्रशांत सावंत म्हणाले,जरांगे- पाटील यांनी मुंबईत आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रविवारी आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे.त्यानुसार मैदानात व्यासपीठ किती फुटाचे ठेवावे, आंदोलन साठी येणाऱ्या मराठा समाज बांधवांसाठी लागणाऱ्या सुविधा काय करता येईल ? याचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर राज्यसरकारने मागील वर्षी आझाद मैदानात आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या मागण्याची अंमलबजावणी करू, असा शब्द दिला होता. त्यामुळे याच ठिकाणी आंदोलन करण्याचा विचार जरांगे पाटील यांनी सुरू केला आहे. तशी त्यांनी तयारी करण्यास सांगितले आहे.

आंदोलनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असली तरी सरकारकडे व उच्च न्यायालयाकडे वेळ बाबत मागणी करू.तसेच आझाद मैदानात आंदोलन स्थळी येथील जबाबदारी ही आमची असेल. पण; बाहेर रस्त्यावरील जबाबदारीचे काम हे शासनाचे असेल. २८ ऑगस्टला ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन पुकारले आहे ,असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ओबीसी समाज बांधव त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करत असेल तर त्यांना आमचा विरोध नाही. आमचे आंदोलन हे शांततेत असेल. जरांगे पाटील यांचे हे आंदोलन मागीलवर्षी जेनझीचेच होते, आताही तेच आहे.

काही दिवसापूर्वी मनोज जरांगे- पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता त्यावेळी त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद लाभला. याचा विचार करून मागील वर्षापेक्षा यावर्षी मराठा समाज बांधवांची या ठिकाणी संख्या वाढेल असे दिसते. परवानगी व इतर प्रश्नासाठी मुंबई पोलीस प्रशासना बरोबर आमच्या बैठका सुरू असे प्रशांत सावंत यांनी सांगितले. यावेळी किरण सावंत, दिनेश उतेकर, नितेश सर्वेकर यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT