Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा? आझाद मैदानासाठी पोलिसांकडे अर्ज दाखल

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू केली. आझाद मैदानात आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज दाखल.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Pudhari
Published on
Updated on

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मुंबईत आंदोलनाची तयारी सुरू केली असून, त्यांच्या प्रतिनिधीने मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला.

जरांगे पाटील यांनी सरकारला २८ ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. अन्यथा २९ ऑगस्टपासून आंदोलनाची भूमिका त्यांनी घेतली आहे. यापूर्वी आंदोलनाचे ठिकाण अंतरवाली सराटी असण्याचे संकेत होते.

Manoj Jarange Patil
Maharashtra SIR Voter Verification: मतदार कुठे गेले? महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ८० लाख मतदार बेपत्ता

मात्र, आता आझाद मैदानासाठी अर्ज दाखल झाला. पोलीस काय निर्णय घेतात यावर या आंदोलनाचे ठिकाण मुंबई की अंतरवाली सराटी याचा फैसला अवलंबून आहे. सरकारकडून २८ ऑगस्टपर्यंत होणारी संभाव्य चर्चा यानंतर आंदोलनाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news