Mumbai Firecracker shop fire File Photo
मुंबई

Mumbai Firecracker shop fire: मालवणीत फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू

मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरात फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १६ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहानवाज नियाज खान (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे.

मालवणी गेट क्रमांक ८, अब्दुल हमीद मार्ग येथील एका फटाक्यांच्या दुकानाला सोमवार रात्री ९ वाजून ५६ मिनिटांच्या सुमारास आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात फटाके, विद्युत वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणे असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. फटाक्यांचे स्फोट झाल्याने दुकानाचे छतही कोसळले.

या घटनेनंतर एक मुलगा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. अग्निशमन दलाच्या शोधमोहिमेदरम्यान दुकानाच्या आत त्याचा मृतदेह आढळून आला. आगीत गंभीररीत्या भाजल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी, १०८ रुग्णवाहिका आणि मुंबई महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या दुर्दैवी घटनेमुळे मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT