Mumbai Ration Grain Diversion: रेशनिंगच्या गहू अपहारामागे 'केपी'चा हात?

बीपीएल आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठीचे गहू-तांदूळ फ्लोअर मिलला विकल्याचा आरोप; काही व्यक्तींची नावे चर्चेत
Mumbai Ration Grain Diversion
Mumbai Ration Grain DiversionPudhari
Published on: 
Updated on: 

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: राज्य सरकारकडून गोरगरिबांना बीपीएल आणि अंत्योदय योजनेअंतर्गत रेशनिंग दुकानातून गहू, तांदूळ दर महिन्यात दोन वेळा वाटप केला जातो. यामागील मूळ उद्देश हा केवळ गोरगरिबांची भूक भागवणे हा आहे.

मात्र रेशनिंग दुकानातील हा गहू आणि तांदूळ रेशनिंग विभाग, स्थानिक पोलीस अधिकार्‍यांना हाताशी धरून त्‍याचा अपहार करणारी टोळी उघडकीस आली आहे. या मालाचा अपहार करून तो रेशनिंग दुकानदारांकडून खरेदी केला जातो.

Mumbai Ration Grain Diversion
Diwali Fire Incidents Mumbai: महामुंबईत फटाक्यांमुळे अग्नितांडव; तब्बल ४०८ ठिकाणी आगी

तोच माल पलटी मारून फ्लोअर मिलला विक्री केला जातो. हे काम गेल्या आठ दहा वर्षांपासून मुंबईत सुरू आहे. यासाठी ‘केपी' पडद्यामागून मुंबईतून संरक्षण देतो, तर प्रवीण गामी हा थेट मालाचा अपहार करून फ्लोअर मिलवर पाठविण्याची चोख जबाबदारी सांभाळतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईसह उपनगरातील आणि ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबईतील रेशनिंग दुकानांतील गव्‍हाचा अपहार करणाऱ्यांमध्ये प्रवीण गामी आणि दिलीप ठक्कर ही दोन नावे पुढे आली आहेत.

यापैकी गामीबरोबर केपीची पार्टनर असल्याचे समजते. मुंबईतील रेशनिंगच्या गव्‍हाचा अपहार करण्यासाठी आणि पोलीस, रेशनिंग अधिकाऱ्यांकडून (भरारी पथक) कुठलाही त्रास होणार नाही याची जबाबदार घेत 'केपी'च्या संरक्षणात प्रवीण गामी रेशनिंगचा गहू पलटी मारून दररोज एक गाडी २२ ते ३० टन गहू राज्यात आणि परराज्यातील फ्लोअर मिलवर पलटी मारून पाठवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवीण गामीचे मरोळ एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा मालाचे दुकान आहे. त्याच ठिकाणी दुसरा गाळा आहे. याच गाळ्यात काळाबाजारातील गहू पलटी मारून रातोरात भरून गुजरात, हुबळी,म्हैसूर,खालापूरसह परराज्यातील फ्लोअर मिलवर पाठवला जातो.

Mumbai Ration Grain Diversion
RMC Plant Licence Renewal: धक्कादायक! बदलीच्या दिवशीच केले आरएमसी प्लांटचे नूतनीकरण

गामीवर अशा प्रकरणाचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असल्याचे समजते. तरीही गामी मुंबई रेशनिंग कंट्रोलर, पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या मदतीने आजपर्यंत हा अपहार करतोय. हे काम करण्यासाठी १५ जणांची टीम कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत ठिकठिकाणाहून रेशनिंगचा गहू उचलला जातो आणि मरोळच्या गाळ्यावर आणून तेथून फ्लोअर मिलसाठी ट्रक लोड केला जातो.

विशेष म्हणजे रेशनिंग दुकानदार हा गहू गोरगरिबांकडून १५ रुपये किलोने खरेदी करतो. तोच गहू गामीसारखे अपहार करणारे २० रुपये किलोने रेशनिंग दुकानदारांकडून विकत घेतात आणि फ्लोअर मिलवर २५ रुपये किलोने विक्री करतात.

हे करत असताना रेशनिंग कंट्रोलर (भरारी पथक ), स्थानिक रेशनिंग अधिकारी (आरओ) आणि पोलीस यांच्या संगनमताने फ्लोअर मिलपर्यंत पोहोचतो. केपी मॅनेजमेंट सांभाळतो. तो रत्नखत्री प्रकरणातील जामीनदार असल्याचे समजते.

त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तो काही पोलीस उपायुक्तांची वसुली करत असल्याचे कळते.यामुळे केपीचे अनेक आजी, माजी पोलीस उपायुक्तांशी चांगले संबंध असल्‍याचे सांगण्‍यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.