मुंबई : मलबार हिल येथील देशातील पहिल्या निसर्ग उन्नत मार्गावर मॉर्निंग करण्यासह दररोज फेरफटका मारण्यासाठी आता मासिक पास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मासिक 750 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
मलबार हिल येथील देशातील पहिल्या निसर्ग उन्नत मार्गाचे 30 मार्च 2025 मध्ये लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावरून निसर्गाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: गर्दी होत असे. मात्र निसर्ग उन्नत मार्गाची क्रेझ गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. शनिवार रविवारचे स्लॉट तर आठवडाभर आधीच हाऊसफुल्ल होत असत. त्यामुळे पर्यटकांनी सोमवार ते शुक्रवार उन्नत मार्गाच्या सफरीची वेळ निवडावी लागत होती.
मात्र आता शनिवार-रविवारीही स्लॉट रिकामी असतात. त्यामुळे पालिकेने मलबार हिल व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मॉर्निंग व अथवा सायंकाळी निसर्ग मार्गावरून फेरफटका मारता यावा यासाठी मासिक पास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत परदेशी पर्यटकांचाही विचार करण्यात आला असून त्यांच्यासाठी मासिक 3 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.
या योजनेअंतर्गत मासिक पासधारकांना दिवसातून एकदाच कोणत्याही स्लॉट निवडावा लागणार आहे. पहाटे 5 ते रात्री 5 वाजेपर्यंत दिवसभरात एक तासासाठी फेरफटका मारता येणार आहे. दिवसभरात 16 स्लॉट असून दिवसभरात केवळ 3 हजार 200 पर्यटक या मार्गावरून फेरफटका मारू शकतात.
30 मार्चला वर्षपूर्ती
मलबार हिल येथील देशातील पहिल्या निसर्ग उन्नत मार्गाचे 30 मार्च 2025 मध्ये लोकार्पण झाले. त्यामुळे या उन्नत मार्गाला एक वर्ष होणार आहे. आतापर्यंत सुमारे 8 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या उन्नत मार्गावर फेरफटका मारल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला
मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी पर्रीीींशीींरळश्र.ालसा.र्सेीं.ळप या संकेतस्थळाला भेट द्या.
भारतीय नागरिकांसाठी 25 रुपये, तर परदेशी नागरिकांना 100 रुपये प्रवेश शुल्क