Multi energy stations : राज्यातील पेट्रोल पंपांवर ‌‘मल्टी एनर्जी स्टेशन्स‌’चा विस्तार वेगाने होणार

नव्या सुविधेमुळे सर्व वाहनांना होणार लाभ
Petrol pump expansion
राज्यातील पेट्रोल पंपांवर ‌‘मल्टी एनर्जी स्टेशन्स‌’चा विस्तार वेगाने होणार pudhari photo
Published on
Updated on

मुंबई /पुणे : शिवाजी शिंदे

राज्यात पारंपरिक इंधनासोबतच पर्यायी ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी पेट्रोल पंपांवर ‌‘मल्टी एनर्जी स्टेशन्स‌’ उभारण्याला गती मिळणार आहे. या नव्या संकल्पनेनुसार एकाच ठिकाणी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

सध्या राज्यात अतिशय मर्यादित ऊर्जा (मल्टी एनर्जी) स्टेशन्स कार्यरत आहेत. मात्र आगामी काळात या संख्येत मोठी वाढ होणे अपेक्षित आहे. पेट्रोल पंपांवर अशा सुविधा उभारण्यासाठी विविध कंपन्यांकडून प्रस्ताव शासनाकडे लकवरच येण्याची शक्यता वाढली आहे. त्यावर राज्य सरकारकडून सकारात्मक विचार सुरू आहे.

Petrol pump expansion
CM Devendra Fadnavis : गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, पायाभूत सुविधा उभारण्यावर भर

केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशभरात स्वच्छ आणि पर्यायी ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी ‌‘मल्टी एनर्जी स्टेशन‌’ ही संकल्पना राबवली जात आहे. या अंतर्गत पारंपरिक इंधनाबरोबरच सीएनजी, एलपीजी आणि ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

दरम्यान, देशभरात 2025 अखेरपर्यंत चार हजारांहून अधिक पेट्रोल पंपांवर ऊर्जा स्टेशन्स(मल्टी एनर्जी) सुरू झाली आहेत. देशात सध्या एक लाखांहून अधिक पेट्रोल पंप कार्यरत असून त्यापैकी मोठ्या प्रमाणावर मल्टी एनर्जी स्टेशन्समध्ये रूपांतर करण्याची योजना आहे.

Petrol pump expansion
Raj Thackeray | सरकारला जाब विचारू नये म्हणून तरुणांना रील करमणुकीत गुंतवले : राज ठाकरे

विशेषतः राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख हायवेवर ही स्टेशन्स उभारण्यावर भर दिला जाणारआहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच या पंपावर इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा सहज उपलब्ध होणार असून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

पेट्रोल पंप होणार ‌‘वन स्टॉप एनर्जी हब‌’

महाराष्ट्रातही या उपक्रमामुळे हरितऊर्जेला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक वाहतुकीकडे मोठे पाऊल टाकले जाणार आहे. आगामी काळात राज्यातील पेट्रोल पंप ‌‘वन स्टॉप एनर्जी हब‌’ म्हणून विकसित होण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news