मुंबई: माहीममध्ये एका तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अल्पवयीन आरोपी मुलाला माहीम पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
जून महिन्यांत घडलेल्या या घटनेची दोन दिवसांपूर्वी माहीम पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. पिडीत मुलगी ही माहिम येथे राहत असून एका नामांकित शाळेत शिकते. १८ जूनला ती शाळेतून घरी जात होती.
यावेळी तिच्या परिचित आरोपी मुलगा तिथे त्याच्या बाईकवरुन आला होता. त्याने तिला शाळेपासून काही अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी आणले. तिथे तिचे हापाय आणि तोंड दाबून त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिक अत्याचार केला होता.
तिचे काही अश्लील फोटो काढून त्याने तिने हा प्रकार कोणालाही सांगू नकोस. नाहीतर तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामीची धमकी दिली होती. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितल नाही.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मात्र दोन दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर ते पिडीत मुलीसोबत माहीम पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनीताब्यात घेतले.