Mahayuti MLC Election Candidate List Pudhari
मुंबई

Mahayuti MLC Election Candidate List: महायुतीकडून अधिकृत उमेदवारांची यादी जारी; बंडोबांच्या मनधरणीचे प्रयत्न

विधानपरिषद निवडणुकीतील बंडखोरांना महायुतीचे राजकीय पुनर्वसनाचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत बंडखोरीचा सामना करणाऱ्या महायुतीने बुधवारी अधिकृत उमेदवारांची यादी जारी केली. ही निवडणूक पक्ष म्हणून नव्हे, तर महायुती म्हणून लढण्याचा निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला असून, मतदारांनी अधिकृत उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन महायुतीने केले आहे.

बंडखोरांनी वरिष्ठांशी चर्चा करून अर्ज मागे घ्यावेत, माघार घेणाऱ्यांचा महामंडळे तसेच विविध समित्यांवरील नियुक्त्या करताना सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही महायुतीच्या नेतृत्वाने दिल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेना नेते राहुल शेवाळे हेही याप्रसंगी उपस्थित होते.

बंडोबांच्या मनधरणीचे प्रयत्न

राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या 17 जागांच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र, आधी जागावाटपाचा तिढा आणि आता विविध ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरोधात मित्रपक्षांकडून झालेली बंडखोरी, यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. गुरुवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने बंडोबांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत.

18 जून रोजी होणारी विधानपरिषदेची निवडणूक महायुतीतर्फेच लढण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी या जागांबाबत एकत्र बसून चर्चा केली आणि जागांचे वाटपही केले.

या नेत्यांनी जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांना निवडून देण्याच्या सूचना महायुतीच्या संबंधित मतदारांना देण्यात आल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, महायुतीतर्फे समन्वय साधत सर्वांना सामावून घेण्याची भूमिका घेण्यात आली आहे. तसेच, महायुतीचेच सर्व उमेदवार निवडून येतील, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय महायुतीचे उमेदवार

1) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : अरुण लखानी (भाजप)

2) अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)

3) सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप)

4) सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप)

5) छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाठ (भाजप)

6) जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप)

7) नागपूर (पोटनिवडणूक) : राजीव पोतदार (भाजप)

8) नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)

9) परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना)

10) यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)

11) ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)

12) रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)

13) पुणे : विक्रम काकडे (राष्ट्रवादी)

14) धाराशिव-बीड-लातूर : बसवराज पाटील (भाजप)

15) भंडारा-गोंदिया : अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

16) अहिल्यानगर : प्राजक्त तनपुरे (भाजप)

17) नांदेड : अमर राजूरकर (भाजप)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT