Woman Farmer Certificate Pudhari
मुंबई

Woman Farmer Certificate: महिला शेतकरी प्रमाणपत्र 15 दिवसांत मिळेल; ऑनलाइन पोर्टल आजपासून सुरू, असा करा अर्ज?

Woman Farmer Certificate Maharashtra: महिलांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाला अधिकृत मान्यता देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम.

पुढारी डिजिटल टीम

Woman Farmer Certificate How To Apply Online

मुंबई : महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीच्या ऑनलाइन पोर्टलचा आज शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळणार असून, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर महिला शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या या योगदानाला अधिकृत मान्यता देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्र हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून कृषी योजना, कृषी कर्ज, विमा, कृषी निविष्ठा, विस्तार सेवा तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ महिला शेतकऱ्यांना अधिक सुलभतेने मिळण्यास मदत होणार आहे. या प्रमाणपत्रासाठी कसा अर्ज करावा, निकष काय याची माहिती जाणून घेऊया...

शेतीची व्याख्या काय?

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 यावर ऑगस्ट 2026 मध्ये माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. यात शेतीची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे.

पीक व फळबाग

पिकांची लागवड, बियाणे तयार करणे, फळबाग व फुलशेती, मशरूम लागवड

जनावरं व दूध

जनावरांची निगा राखणे, दूध व्यवसाय, कोंबडीपालन, मधमाशीपालन, जनावरांसाठी चारा पिकवणे

रेशीम व खत

रेशीम उत्पादन; गांडूळ खत व सेंद्रिय खत तयार करणे

कोणत्याही पद्धतीने केलेली शेती

भाड्याने, कराराने, वाट्याने किंवा स्थलांतर करून केलेली शेती

वनोपज व प्रक्रिया

जंगलातून वनोपज संकलन करून विकणे; शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया व मूल्यवर्धन

कोणत्याही पद्धतीने केलेली शेती

वनोपज व प्रक्रिया

जंगलातून वनोपज संकलन करून विकणे; शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया व मूल्यवर्धन

मासे

मासेमारी, मत्स्यशेती

महिला शेतकरी म्हणजे कोण? निकष काय?

तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असले पाहिजे.

तुम्ही शेतीचं किंवा शेतीशी पूरक कुठलंही काम केलं पाहिजे.

तुम्ही वर्षातील किमान एका हंगामात महाराष्ट्र राज्यात शेती करत असल्या पाहिजे. त्यानंतर कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या गावी किंवा राज्याबाहेर स्थलांतर करत असला तरी तुम्ही पात्र आहात.

तुम्ही स्वतःची शेतजमीन कसता. तुम्ही दुसऱ्याची जमीन तोंडी अथवा लेखी करार करून भाड्याने घेऊन शेती करत असल्यास तुम्ही पात्र आहात.

तुम्ही शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करता किंवा त्याचे मूल्यवर्धन करता (म्हणजे कच्चा
माल वापरण्यायोग्य किंवा विकण्यायोग्य तयार करता).

तुम्ही बियाण्यांच्या, जनावरांच्या किंवा माशांच्या जाती जपता किंवा वाढवता, किंवा बदलत्या
हवामानाला अनुकूल अशा पद्धतीने शेती करता.

तुमची स्वतःची जमीन नाही, पण तुम्ही शेतमजुरी करता, जनावरांची निगा राखता, रोपवाटिकेत काम करता तरीही तुम्ही पात्र आहात.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या वेबसाईटला भेट द्यावी.

वेबसाईटवर आधार कार्ड क्रमांक, आधार कार्डवरील नाव, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक ही माहिती भरावी.

शेती कामाचा प्रकार निवडावा आणि अर्ज सबमिट करावा.

ही संपूर्ण प्रक्रिया साधारण १५ मिनिटात पूर्ण होईल.

महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्जप्रक्रियेतील टप्पे काय आहेत?

अर्ज : ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत हद्दीत राहणारी आणि शेती किंवा शेतीशी पूरक काम करणारी कोणतीही महिला ऑनलाईन अर्ज करू शकते.

अर्ज ग्रामसभा/ नगरपंचायतीसमोर जाईल : हा अर्ज पुढच्या ग्रामसभेच्या किंवा नगरपंचायतीच्या विशेष अथवा सर्वसाधारण बैठकीत मांडला जाईल.

ठराव : अर्ज करणारी महिला अधिनियमातील शेतीच्या व्याख्येनुसार शेती किंवा शेतीपूरक काम करते का, हे ग्रामसभा/ नगरपंचयातीद्वारे खातरजमा करून अर्ज मंजूर करायचा की नाकारायचा, याचा ठराव
मंजूर करेल.

प्रमाणपत्र मिळेल : ठराव मंजूर झाल्यापासून 15 दिवसांत महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल.

अर्ज नाकारल्यास काय करावे?

अर्ज नाकारल्याचं कारण 7 दिवसांत लेखी कळवलं जाईल.

निर्णयावर किंवा झालेल्या उशिरावर हरकत असल्यास, महिला 120 दिवसांच्या आत
अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागू शकते. अपिलीय अधिकारी 30 दिवसांत निर्णय
देईल. या मुदतीत दाद मागता आली नाही, आणि त्यामागे योग्य कारण असेल, तर मुदत
उलटूनही दाद मागितली जाऊ शकते.

अर्ज न करताही मान्यता शक्य आहे का?

हो. पात्र महिलेने स्वतः अर्ज केला नसला, तरीही ग्रामसभा स्वतःहून तिला महिला
शेतकरी म्हणून मान्यता देऊ शकेल व महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देऊ शकेल.

अर्ज करताना अडचण येत असल्यास कोणाशी संपर्क साधावा?

महिला शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी, यासाठी तालुका पातळीवर आणि जिल्हा पातळीवर "महिला शेतकरी सहाय्य अधिकारी" नेमण्यात आले आहेत.

अर्ज करताना अडचण आली, प्रमाणपत्राबाबत शंका असेल, किंवा तुमच्या हक्कांबद्दल माहिती हवी असेल - तर तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला शेतकरी सहाय्य अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधता येईल.

महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे काय फायदा होणार?

सरकारच्या विविध योजनांमध्ये लाभ मिळणार आहे.

> शेतीसाठी आर्थिक मदत व अनुदानासंबंधी योजना

> बियाणे, खते व इतर शेती- साहित्य पुरवणाऱ्या योजना

> शेतीविषयक कर्ज, पीक विमा व मार्गदर्शन सेवा

> नेण्यासाठी वाहतूक, साठवणूक व खरेदी- विक्रीशी संबंधित सुविधा

> राज्य शासनाच्या कर्ज धोरणांशी संबंधित सुविधा

> विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता व आर्थिक/सामाजिकदृष्ट्या दुर्बल एकल महिला शेतकऱ्यांसाठीच्या मदत कार्यक्रमांसाठी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT