Rain Alert Pudhari
मुंबई

Rain Alert: राज्यभरात आजपासून पावसाचा अंदाज

18 ते 22 एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता; तापमानात होणार घट

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यात शनिवार (दि. 18) पासून 22 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कमाल तापमानात किंचित घट होणार असून काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो. शुक्रवारी अकोला, अमरावतीचे तापमान 44.2, तर पुणे 40 अंशांवर पोहोचले होते.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाच दिवस पाऊस होता. त्यानंतर पुन्हा तापमान वाढले. दुसरा आठवडा चांगलाच उष्णतेचा राहिला. आता 18 ते 22 एप्रिल या चार दिवसांत पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी प्रमुख शहरांतील तापमान असे होते- अकोला 44.2, अमरावती 44.2, पुणे 40, जळगाव 41.5, कोल्हापूर 38.1, महाबळेश्वर 33.1, मालेगाव 43.4, नाशिक 37.5, सांगली 39.5, सातारा 41.2, सोलापूर 43.4, धाराशिव 41.2, छत्रपती संभाजीनगर 41.4, परभणी 42, बीड 40.8, बुलडाणा 41.5.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT