Vidhan Parishad Election Pudhari
मुंबई

Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान

Voting Begins for 11 Legislative Council Seats Today: एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित ११ जागांवर ही निवडणूक होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी आज, १८ जून रोजी मतदान होणार आहे. एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले असून, उर्वरित ११ जागांवर ही निवडणूक होत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर, मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनीधी मतपत्रिकेद्वारे मतदान करतील.

सिंधुदुर्ग-रत्नागिरी-रायगड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिकेत तटकरे, ठाण्यातून शिवसेनेचे रविंद्र फाटक, पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विक्रम काकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी, अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे, यवतमाळ मतदारसंघातून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी आदी महायुतीचे सहाही उमेदवार बिनविरोध निवडून आले.

गुरुवारी सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT