राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक उच्चस्तरिय टास्कफोर्स गठीत करण्याचे आदेश दिले होते.
सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत या टास्कफोर्समध्ये राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती-तंत्रज्ञान व एआय विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, युपीएससीचे माजी सदस्य एअर मार्शल एव्हीएसएम, व्हीएसएम अजित शंकरराव भोसले (सेवानिवृत्त), आयआयटी मुंबईचे प्रा. श्यामप्रसाद करगड्डे यांचा समावेश करण्यात आला.
विविध परीक्षांचा आढावा घेऊन एक सुरक्षित, पारदर्शी, विश्वासार्ह धोरण आणि पद्धती सूचविण्याचे काम या टास्कफोर्सला देण्यात आले असून, असे करताना राज्यातील सर्व महसुली विभागात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संबंधित घटकांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया करण्यास त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
आता गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सहा विभागांना भेट देऊन विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार आहे.
- पुणे : 12 सप्टेंबर
- नागपूर : 16 सप्टेंबर
- अमरावती : 17 सप्टेंबर
- छत्रपती संभाजीनगर : 21 सप्टेंबर
- कोकण : 29 सप्टेंबर
- नाशिक : 30 सप्टेंबर
टास्क फोर्सच्या विभागनिहाय भेटींचे वेळापत्रक
पुणे विभाग — १२ सप्टेंबर २०२६
स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
ई-मेल : pune-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागपूर विभाग — १६ सप्टेंबर २०२६
स्थळ : डीपीडीसी हॉल, नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर
ई-मेल : nagpur-examreformstaskforce@maharashtra.gov.in
अमरावती विभाग — १७ सप्टेंबर २०२६
स्थळ : अमरावती
ई-मेल : amravati-examreformstaskforce@maharashtra.gov.in
छत्रपती संभाजीनगर विभाग — २१ सप्टेंबर २०२६
स्थळ : स्मार्ट सिटी कार्यालय, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजीनगर
ई-मेल : csn-examreformstaskforce@maharashtra.gov.in
कोकण विभाग — २९ सप्टेंबर २०२६
स्थळ : चेतना महाविद्यालय व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई
ई-मेल : konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नाशिक विभाग — ३० सप्टेंबर २०२६
स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक
ई-मेल : nashik-examreformstaskforce@maharashtra.gov.in
नागरिक व संबंधित हितधारक आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या वरील ई-मेल पत्त्यावर पाठवू शकतात.
या विभागनिहाय संवादातून प्राप्त होणाऱ्या सूचना व अभिप्रायांचा टास्क फोर्सकडून अभ्यास करण्यात येणार आहे. त्याआधारे भरती परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध, परीक्षा सुरक्षेचे बळकटीकरण, प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता वाढविणे तसेच परीक्षा व्यवस्था अधिक उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक सुधारणांबाबत शासनास शिफारशी सादर करण्यात येतील.
भेटीची वेळ, सहभागाची प्रक्रिया तसेच इतर सविस्तर माहिती संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाकडून स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.