मुंबई

Maharashtra Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी हस्तांतरित

मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम केली हस्तांतरित

पुढारी वृत्तसेवा

maharashtra farmer loan waiver second installment : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज (दि. २४) वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरित केली आहे.कर्जमाफीचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळला आहे.

दुसऱ्या हप्त्यात ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना लाभ

आजच्या दुसऱ्या हप्त्यात ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांना एकूण ५ हजार ८६ कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांची मदत

या योजनेअंतर्गत आतापर्यंत १२ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना एकूण १० हजार ११५ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून ही योजना राबविण्यात येत आहे.

यादींमध्‍ये नाव नसल्‍याने शेतकर्‍यांमध्‍ये होती निराशा

सरकारकडून आतापर्यंत जारी केलेल्‍या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा होती. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्जमाफीसंदर्भात मागच्या आठवड्यात माहिती दिली होती. राज्यातील ५३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे वचन देण्यात आले होते. राज्य सरकारने ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ करुन शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे राज्यातील ४५ हजार शेतकऱ्यांना वीज माफ केली आहे. पुढील ५ वर्षे त्यांना वीज बिल येणार नाही अशा पद्धतीचे काम सरकारकडून सुरू असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT