Maharashtra Deputy Chief Ministers List Pudhari
मुंबई

Deputy CM Maharashtra: नाशिकराव तिरपुडे ते सुनेत्रा पवार; राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी वाचा

Deputy CM of Maharashtra: महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण, आजवरच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी वाचा...

पुढारी डिजिटल टीम

Complete list of Maharashtra Deputy Chief Ministers

मुंबई : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शनिवारी पहिल्यांदा एक महिला विराजमान झाली. सुनेत्रा पवार यांनी शनिवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण, आजवरच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी वाचा...

पहिले उपमुख्यमंत्री कोण?

महाराष्ट्रात पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदी नाशिकराव तिरपुडे विराजमान झाले होते. 1978 मध्ये दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढल्या होत्या. निवडणुकीनंतर काँग्रेसमधील रेड्डी आणि इंदिरा या दोन्ही गटांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. यात उपमुख्यमंत्रीपद इंदिरा- काँग्रेसच्या नाशिकराव तिरपुडे यांना देण्यात आले होते.

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

१. नाशिकराव तिरपुडे

पक्ष : काँग्रेस

कालावधी : 5 मार्च 1978 - 18 जुलै 1978

मुख्यमंत्री कोण?

वसंतदादा पाटील

2. सुंदरराव सोळंके

पक्ष : काँग्रेस (समाजवादी)

कालावधी : 18 जुलै 1978 - 17 फेब्रुवारी 1980

मुख्यमंत्री कोण?

शरद पवार

3. रामराव आदिक

पक्ष : काँग्रेस

कालावधी : 2 फेब्रुवारी 1983 - 5 मार्च 1985

मुख्यमंत्री कोण?

वसंतदादा पाटील

4. गोपीनाथ मुंडे

पक्ष : भाजप

कालावधी : 14 मार्च 1995 - 18 ऑक्टोबर 1999

मुख्यमंत्री कोण?

मनोहर जोशी, नारायण राणे

5. छगन भुजबळ

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 18 ऑक्टोबर 1999 - 23 डिसेंबर 2003

मुख्यमंत्री कोण?

विलासराव देशमुख

6. विजयसिंह मोहिते-पाटील

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 25 डिसेंबर 2003 -31 ऑक्टोबर 2004

मुख्यमंत्री कोण?

सुशीलकुमार शिंदे

7. आर.आर.पाटील

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 1 नोव्हेंबर 2004 - 8 डिसेंबर 2008

मुख्यमंत्री कोण?

विलासराव देशमुख

8. छगन भुजबळ

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 8 डिसेंबर 2008 - 7 नोव्हेंबर 2010

मुख्यमंत्री कोण?

अशोक चव्हाण

9. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 11 नोव्हेंबर 2010 - 25 सप्टेंबर 2012

मुख्यमंत्री कोण?

पृथ्वीराज चव्हाण

10. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 7 डिसेंबर 2012- 28 सप्टेंबर 2014

मुख्यमंत्री कोण?

पृथ्वीराज चव्हाण

11. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 23 नोव्हेंबर 2019- 28 नोव्हेंबर 2019

मुख्यमंत्री कोण?

देवेंद्र फडणवीस

12. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 30 डिसेंबर 2019- 30 जून 2022

मुख्यमंत्री कोण?

उद्धव ठाकरे

13. देवेंद्र फडणवीस

पक्ष : भारतीय जनता पक्ष

कालावधी : 30 जून 2022- 5 डिसेंबर 2024

मुख्यमंत्री कोण?

एकनाथ शिंदे

14. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 2 जुलै 2023 - 5 डिसेंबर 2024

मुख्यमंत्री कोण?

एकनाथ शिंदे

15. एकनाथ शिंदे

पक्ष : शिवसेना

कालावधी : 5 डिसेंबर 2024 ते आजपर्यंत

मुख्यमंत्री कोण?

देवेंद्र फडणवीस

16. अजित पवार

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 5 डिसेंबर 2024 ते 28 जानेवारी 2026

मुख्यमंत्री कोण?

देवेंद्र फडणवीस

17. सुनेत्रा पवार (अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर जबाबदारी)

पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कालावधी : 31 जानेवारी 2026 ते आजपर्यंत.

मुख्यमंत्री कोण?

देवेंद्र फडणवीस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT