Online Gaming Scam Pudhari
मुंबई

Online Gaming Scam: ऑनलाइन गेमिंगद्वारे मुलांची फसवणूक; महाराष्ट्र सायबर पोलिसांचा इशारा

फ्री जेम्स किंवा फ्री डायमंड्स देणाऱ्या अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: ऑनलाइन गेम खेळणाऱ्या लहान मुलांना आणि किशोरवयीन मुलांना लक्ष्य करून सायबर गुन्हेगारांकडून नव्या प्रकारची फसवणूक केली जात आहे .पालक आणि मुलांनी यापासून सावध राहावे, असा इशारा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिला आहे.

'फ्री जेम्स', 'फ्री डायमंड्स', 'मोफत स्किन्स' किंवा 'प्रीमियम रिवॉर्डस' देण्याचे आमिष दाखवून मुलांची वैयक्तिक माहिती, गेमिंग अकाउंट आणि पालकांच्या बँक खात्याची माहिती चोरली जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सायबर गुन्हेगार सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स, यूट्यूब कमेंट्स किंवा बनावट वेबसाइट्सद्वारे मुलांशी संपर्क साधतात. त्यानंतर "फ्री रिवॉर्ड" मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करण्यास, ओटीपी सांगण्यास किंवा गेमिंग अकाउंटची लॉगिन माहिती देण्यास भाग पाडले जाते. अनेकदा पालकांच्या मोबाईलमधून अनधिकृत व्यवहारही केले जातात.

मुलांना ऑनलाइन गेमिंगमधील फसवणुकीच्या पद्धतींबाबत जागरूक करा आणि कोणत्याही आकर्षक ऑफरवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची खातरजमा करा, असे आवाहन सायबर पोलिसांनी पालकांना केले आहे.

महाराष्ट्र सायबर पोलिसांचा सल्ला

  • फ्री जेम्स किंवा फ्री डायमंड्स देणाऱ्या अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.

  • गेमिंग अकाउंटचा पासवर्ड किंवा ओटीपी कोणालाही सांगू नका.

  • गेम किंवा इन-ॲप खरेदी फक्त अधिकृत स्टोअरमधूनच करा.

  • मुलांच्या गेमिंग व्यवहारांवर पालकांनी लक्ष ठेवावे.

  • संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT