maharashtra ats pakistani racket PUDHARI
मुंबई

maharashtra ats pakistani racket: महाराष्ट्र ATS ची राज्यात मोठी कारवाई! पाकिस्तीनी टोळीशी संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Anirudha Sankpal

maharashtra ats arrests pakistani racket links: महाराष्ट्र एटीएसने आज सकाळी ८ वाजल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी टोळीशी संबंधित असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. तसेच डोग्रा गँगचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तींवर देखील महाराष्ट्र एटीएसने कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आज महाराष्ट्र एटीएसने पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी टोळी आणि डोग्रा टोळीशी संबंधित असलेल्या किंवा त्यांचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींवर मोठी कारवाई सुरू केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नालासोपारा, मीरा रोड, नागपूर, पुणे, मुंबई, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे एटीएसचे छापे सुरू झाले आहेत. सोशल मीडियावर या गुंडांशी जोडलेल्या किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांची एटीएस चौकशी करणार आहे. महाराष्ट्रातील गुंडांचे जाळे मोडून काढण्यासाठी एटीएसने मोठी कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT