file photo  
मुंबई

Lok Sabha Elections 2024 : उच्चभ्रू सोसायट्या, टॉवर्समध्येही आता मतदान केंद्रे

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्चभ्रू मतदारांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी, तसेच शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुंबईसारख्या महानगरातील मोठ्या गृहसंकुलांत उंच इमारतींच्या आवारात मतदान केंद्रांची सुविधा देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. (Lok Sabha Elections 2024)

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी बुधवारी ही माहिती दिली. मतदान केंद्र गैरसोयीचे असल्याने अनेकदा मोठ्या गृहसंकुलांत राहणारे मतदार मतदानासाठी खाली उतरत नाहीत. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांतील मोठ्या गृहसंकुलांत तसेच उंच इमारतींच्या आवारात मतदान केंद्राची सुविधा दिली जाणार आहे. यासाठी अलीकडेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांना अशा ठिकाणी मतदान केंद्रांसाठी जागा शोधण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रयोगामुळे जवळपास मतदान केंद्रांची संख्या दोन हजारांनी वाढेल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांना त्यांच्या इमारतीच्या आवारातील मतदान केंद्रात जाऊन मतदान करता येईल, असे देशपांडे यांनी सांगितले. (Lok Sabha Elections 2024)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT