landslide in Katodipada of Ghatkopar
घाटकोपरच्या कातोडीपाड्यात दरड कोसळली Pudhari Photo
मुंबई

Mumbai Rain : घाटकोपरच्या कातोडीपाड्यात दरड कोसळली

पुढारी वृत्तसेवा

घाटकोपर : पुढारी वृत्‍तसेवा

मुंबई पूर्व उपनगराला पावसाने आज (रविवार) अक्षरश झोडपून काढले. यामुळे एकीकडे रस्ते जलमय झाले होते, तर दुसरीकडे काही ठिकाणी पडझडीच्या घटना ही घडल्या. घाटकोपरच्या कातोडीपाडा परिसरात काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले आहे. (Mumbai Rain)

कातोडीपाडा येथील काजरोळकर सोसायटी ही डोंगराळ विभागात आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम ही सुरु आहे. मात्र रविवारी दुपारी या ठिकाणी डोंगराचा मोठा भाग खालील घरांवर आला. या वेळी इथल्या रहिवाशांनी घर सोडून बाहेर पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Mumbai Rain)

त्यांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केला. घटनास्थळी मुंबई मनपाचे कर्मचारी देखील दाखल झाले. त्यानी मदतकार्य सुरु केले. घाटकोपरसह पूर्व उपनगरात अनेक डोंगराळ वस्त्या पावसात भीतीच्या छायेत असतात, या विभागात लवकरात लवकर संरक्षक भिंती उभ्या करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. (Mumbai Rain)

SCROLL FOR NEXT