Rainfall Live Updates | पावसाने मुंबईसह परिसराला झोडपले

पुढील ३, ४ तासांत 'या' भागात ऑरेंज अलर्ट
Heavy rain likely in Mumbai city and suburbs in next 24 hours
पावसाने मुंबईसह परिसराला झोडपले Pudhari File photo
Published on
Updated on

मुंबईत पावसाचा जोर कायम

मुंबईत पावसाचा जोर कायम असून उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. परळ नाका, हिंदमाता, सायन गांधी मार्केट व ठीक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. वालजी लड्डा मार्ग मुलुंड येथे झाड पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. तर मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांच्या लेटमार्कमुळे आज (रविवार) कुटुंबासह पावसाची मजा घेण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले.

 घाटकोपरच्या कातोडीपाड्यात दरड कोसळली

मुंबई पूर्व उपनगराला पावसाने आज (रविवार) अक्षरश झोडपून काढले. यामुळे एकीकडे रस्ते जलमय झाले होते, तर दुसरीकडे काही ठिकाणी पडझडीच्या घटना ही घडल्या. घाटकोपरच्या कातोडीपाडा परिसरात काजरोळकर सोसायटीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले आहे.

मरीन ड्राइव्हवर समुद्रात लाटा उसळत असल्याचे दृश्य

मुंबई शहराच्या काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मरीन ड्राइव्ह परिसरात समुद्रात प्रचंड लाटा उसळत असल्याचे व्हिज्युअल्स एएनआयने शेअर केले आहे.

चेंबूरमध्ये पाणी साचले

मुंबईतील गोरेगाव, अंधेरी, चेंबूर, मुलुंड आणि ऐरोलीसह विविध भागांवर मुसळधार पावसाचा परिणाम होत आहे. आज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाचे मोजमाप खालीलप्रमाणे नोंदवले गेले: मलबार हिल येथे 57 मिमी, कांदिवली 55 मिमी, वांद्रे 46 मिमी, चेंबूर 49 मिमी, कुर्ला 57 मिमी पाऊस झाला.

पुढील ३ ते ४ राज्यातील या भागांत अतिमुसळधार

राज्यातील बहुतांशी भागात पाऊस सुरूच आहे. दरम्यान काही भागात तो जोर धरत असल्याचेही दिसत आहे. दरम्यान राज्यातील काही भागात पुढील ३ ते ४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाचे वर्तवली आहे. पुढील ३ ते ४ तासांत ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान काही ठिकाणी जोरदार ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे देखील हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

काही ठिकाणी ते 70-100 मिमी पावसाची नोंद

मुंबई आणि नवी मुंबईच्या बाजूला असलेल्या काळ्या वर्तुळांनी दर्शविल्याप्रमाणे गेल्या ६ तासांत ते खूप भारी श्रेणीत पाऊस सुरू आहे. तर इतर काही ठिकाणी ते 70-100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सखल भागात पाणी साचले असून, रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, असे डॉ. के. एस होसाळीकर यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news