मुंबई : मुंबई शहर व उपनगरात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. उपनगरापेक्षा शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी शनिवारी सकाळी ६ ते ७ या एक तासात मुलुंड, दिंडोशी, मालाड, चिंचोली, गोरेगाव मागाठाणे, घाटकोपर येथे ३९ मिमी ते ४७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
गोरेगाव, मालाडमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होते. यासाठी येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कल्याण व सीएसएमटी-पनवेल दरम्यानची लोकल सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने तर पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते चर्चगेट लोकल सेवा सुमारे ५ ते १० मिनिट विलंबाने सुरू आहे.
शहर - ६६ मिमी
पूर्व उपनगर - ५३ मिमी
पश्चिम उपनगर - ५७ मिमी
शनिवारी सकाळी ६ ते ७ पडलेला पाऊस
मुलुंड - ५१ मिमी
दिंडोशी - ४८ मिमी
चिंचोली - ४५ मिमी
मालाड - ४३ मिमी
गोरेगाव - ३८ मिमी
मगाठाणे - ३७ मिमी