ladakibahin Yojana Pudhari
मुंबई

Ladki Bahin Yojana: e-KYC कसे करावे, लाडक्‍या बहिणींसाठी Step by Step Process सोप्या भाषेत!

Aditi Sunil Tatkare: महिला व बालकल्‍याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती

Namdev Gharal

Ladki Bahin Yojana E KYC How to do it Online

मुंबई : महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजनेसाठी आता E-KYC बंधनकारक केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना इ - केवायसी करणे सुलभ व्हावे यासाठी एक पोर्टल तयार केले आहे. लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी दोन महिन्यांच्या आत पूर्ण करायची आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. त्‍यामुळे इ केवायसी कसे करावे इे समजून घेणे महत्‍वाचे ठरले. महिला व बालकल्‍याण मंत्री आदिती तटकरे यांनी यांसदर्भात माहिती दिली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी कसे करावे?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी मोबाईल किंवा डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या ब्राऊजरमध्ये www.ladakibahin.maharashtra.gov.in टाईप करून Enter दाबा.

यानंतर वेबसाईटच्या मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.

* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्यात जाता येईल.

यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.

वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

e-KYC करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी

योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT