Kurla One Inch Ganpati Pudhari
मुंबई

Kurla One Inch Ganpati: अवघा १ इंचाचा गणराया पाहिलात का? शेषनागाच्या फण्याखालील ‘लिटिल मास्टर’ची कुर्ल्यात चर्चा

श्री ज्ञानदीप मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम; ३९व्या वर्षानिमित्त छोटेखानी गणेशमूर्ती ठरली आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: कुर्ला (पश्चिम) येथील श्री ज्ञानदीप मित्र मंडळ कुर्ला स्टेशनचा राजा यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा अनोखे आकर्षण ठरले आहे.मंडळाच्या ३९ व्या वर्षानिमित्त यावर्षी अवघ्या १ इंचाच्या श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

शेषनागाच्या भव्य फण्याखाली विराजमान असलेल्या या छोटेखानी गणरायाचे रूप भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.लिटिल मास्टर शेषनाग गणेशा अशी या मूर्तीची ओळख आहे.

आकाराने अवघी १ इंचाची असली तरी भक्ती आणि महिमा अनंत असल्याचा संदेश या मंडळाने दिला आहे. मुंबई पुर्व उपनगरातील कुर्ला येथील श्री ज्ञानदीप मित्र मंडळाची ही मूर्ती चर्चेचा विषय ठरली आहे.

गणेशभक्तांना नवी कंपाउंड, हरियाणावाला लेन, स्टेशन रोड येथे या विशेष गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष ईश्वर अहिरे म्हणाले,यंदा भक्तांसाठी काहीतरी वेगळे आणि अविस्मरणीय साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अवघ्या १ इंचाच्या गणरायाचे हे अनोखे रूप म्हणजे आकाराने छोटे,पण भक्ती आणि श्रद्धेने विशाल असे श्रींचे दर्शन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT