Kishori Pednekar Pudhari
मुंबई

Kishori Pednekar: सचिव विभाग जर तुमची नजर फिरत नसेल, तर आम्ही फिरवून दाखवू; विरोधी पक्षनेत्या पेडणेकरांचा इशारा

यावेळी आपल्या भाषणात उबाठा पक्षाच्या नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गारगाईचा प्रस्ताव मंजूर करत्यावेळी मतदानाची रितसर मागणी केली होती.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी गारगाई धरण पाणी प्रकल्प प्रस्तावार विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील सदस्यांची कोंडी केल्याचे दिसून आले. यावेळी आपल्या भाषणात उबाठा पक्षाच्या नगरसेविका तथा विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गारगाईचा प्रस्ताव मंजूर करत्यावेळी मतदानाची रितसर मागणी केली होती.

मात्र सचिव विभागातील पालिका सचिव आणि उपसचिव यांनी महापौर रितू तावडे यांनी चूकीचे मार्गदर्शन करून मतदान घेवू दिले नाही. परिणामी पेडणेकर सचिव विभागावर संतापल्या होत्या.

सचिव विभागाची नजर फिरत नसेल, तर आम्ही फिरवून दाखवू, असा थेट इशारा त्यांनी सभागृहात दिला. तसेच महापौरांचा अपमान कधीच होणार नाही. मात्र माजी सचिवाच्या घरावर कुणी मोर्चे काढला होता, हे आम्हाला बोलू देवू नका, असेही ठणकावून सांगितले.

यावेळी सचिव विभागाची बाजू घेत सभागृह नेते गणेश खणकर म्हणाले की, या सभागृहात कामकाज कसे चालावे. याची एक परंपरा आहे. सचिवांना अशी भाषा वापरणे योग्य नाही. हात वारे करणे, महापौरांच्या टेबलाकडे धावत येणे. मी कधी सचिव विभागाविरोधात ही भाषा वापरली नाही. अशाप्रकारे तुम्ही दबाब वापरू शकत नाही, असे प्रतिउत्तर गणेश खणकर यांनी पेडणेकरांना दिले.

सभागृहात बेलचे महत्व ठेवा

एप्रिल महिन्यातील पहिल्या सभागृहात सत्ताधारी सह विरोधी नगरसेवकांनी वेळापेक्षा अधिक भाषण करत असल्याने महापौर रितू तावडे संतापलेल्या दिसून आल्या. त्यांनी सर्व सभासदांना सूचना करत, मी बेल मारेल तेव्हा, एकच शेवटची लाईन बोलून थांबा, बेलचे महत्व लक्षात ठेवा, असा इशारा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT