MHADA Pudhari
मुंबई

MHADA |अँटॉप हिलमधील म्हाडाच्या ११० फ्लॅटवर बांग्लादेशींचा ताबा : सोमय्या

Kirit Somaiya alleges Bangladeshi illegal occupation of MHADA flats- म्हाडाच्या ११० फ्लॅटवर बांग्लादेशींचा ताबा : सोमय्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मालकीच्या ११० फ्लॅट्स या बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी लँड जिहाद झाल्याचा आरोप करत पुराव्यांसह तक्रार दाखल केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील अँटॉप हिल येथील अत्यल्प आणि अल्प गटातील घरांमध्ये मूळ लाभार्थी-विजेत्यांऐवजी, घुसखोर बांगलादेशी वास्तव्यास असल्याचा आरोप केला आहे. म्हाडाच्या सोडतीत मूळ लाभार्थ्यांच्या नावे ही घरे विकत घेण्यात आली असली तरी यातील ४१ घरे प्रत्यक्षात घुसखोर, बांगलादेशी व्यक्तींच्या ताब्यात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा करत या प्रकरणाच्या संपूर्ण चौकशीची मागणी सोमय्या यांनी केली असून त्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर यांना पत्रही पाठविले आहे.

अँटॉप हिलमधील नूरा बाजार येथील काही रहिवाशांनी अलीकडेच आपली भेट घेतल्याचे सांगून सोमय्या म्हणाले की, मुंबई मंडळाच्या सोडतीतील ४१ घरांमध्ये घुसखोर, बांगलादेशी वास्तव्यास असल्याचा आरोप या रहिवाशांनी कागदपत्रांसह आपल्याकडे केला. या कागदपत्रांची पडताळणी केली असता, मूळ लाभार्थ्यांऐवजी या घरांमध्ये घुसखोर राहत असल्याचे दिसून आले आहे.

म्हाडाच्या सोडतीत हिंदूंच्या नावे अर्ज भरण्यात आले, घरांचा ताबाही याच नावांवर घेण्यात आला आहे. मात्र पॉवर ऑफ अटर्नीद्वारे ही घरे बांगलादेशींना विकण्यात आली असून सध्य ते तिथे वास्तव्यास आहेत. तेव्हा या प्रकरणाच तातडीने चौकशी व्हावी, अशी लेखी मागण आपण बोरिकर यांच्याकडे केल्याचे सोमय्य यांनी सांगितले.

म्हाडा उपाध्यक्षांकडून दखल

दरम्यान, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली असून त्यांनी चौकशीचे आश्वासन दिल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. तसेच, १४ नोव्हेंबर रोजी आपण स्वतः अँटॉप हिलमधील घरांची पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT