Railway Block Pudhari
मुंबई

Railway Block: पश्चिम रेल्वे प्रवाशांची आज रखडपट्टी; १४,१५ जुलैला केळवे रोड येथे ब्लॉक

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पश्चिम रेल्वेकडून येत्या १४ आणि १५ जुलै रोजी केळवे रोड स्टेशनवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचा परिणाम उपनगरीय लोकल तसेच मेल आणि एक्सप्रेस रेल्वे सेवेवर होणार आहे. नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली आणि कवच ट्रेन संरक्षण प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी हा ब्लॉक घेत असल्याचे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिग्नल यंत्रणेत बदल कामासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक १४ जुलै रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० पर्यंत असणार आहे. तसेच नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि कवच प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक १५ जुलै रोजी सकाळी ८.१० ते सकाळी ११.१० पर्यंत असणार आहे.

या दरम्यान, १५ जुलै रोजी नियोजित पाच उपनगरीय लोकल गाड्या रद्द होणार आहेत. यामध्ये बोईसर-वसई रोड मेमू, डहाणू रोड-विरार लोकल, डहाणू रोड-विरार लोकल, विरार-डहाणू रोड लोकल, चर्चगेट-डहाणू रोड लोकल यांचा समावेश आहे. तसेच ब्लॉक कालावधीत अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे.

कोणत्या गाड्यांना बसणार फटका

१४ जुलै रोजी : मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस, दादर येथून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना २५ मिनिटे ते जवळपास २ तासांचा विलंब होणार आहे.

१५ जुलै रोजी : अहमदाबाद आणि निवडक उपनगरीय लोकल गाड्या उशिरा धावणार आहेत. तसेच काही गाड्यांच्या सुरुवात आणि अंतिम स्थानकात बदल केला जाणार आहे.

सुरत-विरार एक्सप्रेस, डोंबिवली-बोईसर मेमू,विरार-वलसाड पॅसेंजर या गाडयांची स्थिती तपासून नंतरच प्रवास करण्याचा पश्चिम रेल्वेने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT