KDMC BJP Unopposed Victory Pudhari
मुंबई

KDMC BJP Unopposed Victory: केडीएमसीत भाजपाचा तिसरा बिनविरोध विजय; कल्याण-डोंबिवलीत विजयी घोडदौड

उमेदवारी अर्ज छाननीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद; डोंबिवलीतील पॅनल 26 ब मधून भाजपाच्या रंजना पेणकर विजयी

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : केडीएमसीच्या 122 जागा निवडी करीता घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण व डोंबिवलीत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याची त्याची बिनविरोध निवड झाली होती.

दुसऱ्या दिवशी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी होती. डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 26 ब मध्ये भाजपा व अपक्ष उमेदवार या दोघांचे उमेदवारी अर्ज आले होते. उमेदवारी अर्ज छाननीत अपक्ष उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपा उमेदवार रंजना पेणकर यांचा उमेदवारी पात्र ठरल्याने त्याची बिन विरोध निवड झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत भाजपाचा तिसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याची अर्ज छाननी बुधवारी पार पडली. डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक 26 ब सर्वसाधारण महिला या प्रवर्गा साठी भाजपाच्या रंजना मितेश पेणकर व अपक्ष गायत्री गव्हादे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. अर्ज छाननीच्या वेळी अपक्ष उमेदवार गायत्री गव्हादे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपाच्या रंजना मितेश पेणकर यांची बिन विरोध निवड झाली आहे.

विशेष म्हणजे पॅनल क्र.25 मधील अ, ब, क व ड या चार जागा पैकी ब, क या दोन्ही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांवर भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने आता उर्वरित अ नागरिकांचा मागास प्रवर्ग व ड सर्वसाधारण प्रवर्गासाठी या दोन जगासाठी या पॅनल मधील निवडणूक होणार आहे. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अजून काही या पॅनलमध्ये चमत्कार होईल का या कडे सर्वाच लक्ष लागून राहिले आहे. भाजपाचा निवडणुकीपूर्वीच तीन उमेदवारांचा बिनविरोध विजय झाल्याने डोंबिवली कल्याणात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT