Cyber Crime  pudhari photo
मुंबई

Kandivali Fraud Case: खजिना, चमत्कारी चष्मा अन् पैशांचा पाऊस! कांदिवलीत वृद्धाची ३१ लाखांची फसवणूक

पाच महिन्यांपासून फरार दोन भामट्यांना पोलिसांनी केले गजाआड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पैशांच्या पावसाच्या बहाण्याने एका वयोवृद्धाची सुमारे ३१ लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या दोन भामट्यांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. भवरलाल देवाराम पालीवल आणि गौरीशंकर नारायणलालजी शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले.

६० वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध मूळचे राजस्थानचे रहिवाशी असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कांदिवली परिसरात राहतात. दहा वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची ओळख गौरीशंकरशी करुन दिली होती. दरम्यान, चष्मा खरेदीसाठी त्याला तीन लाखांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी त्याला तीन लाख रुपये दिले होते.

राजस्थानच्या गुरुकडून तो चष्मा लवकरच मिळणार आहे असे त्याने सांगितले. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या घरातील जमिनीत खजिना असून तो खजिना शोधून काढण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून त्यांच्याकडे सहा लाखांची मागणी केली होती.

पैशाचा पाऊस पडलाच नाही

ऑगस्ट २०२३ रोजी भवरलाल हा त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने गौरीशंकर त्याच्या घरी पैशांचा पाऊस पाडणार आहे. याबाबत कोणालाही काहीही सांगून नकोस. पूजा केल्यानंतर पैशांचा पाऊस पडेल.

या पूजेसाठी किमान पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पैशांचा पाऊस पडला नाहीतर सर्व रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्यासोबत एक करार करुन त्यांना पंधरा लाख रुपये दिले होते.

अशा प्रकारे विविध कारण सांगून त्यांनी त्यांच्याकडून सुमारे ३१ लाख रुपये घेतले होते, मात्र त्यांना एक्सरे असलेला चष्मा, जमिनीत गाडलेला खजिना तसेच पैशांचा पाऊस पडलाच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT