Jio Platforms IPO Pudhari
मुंबई

Jio Platforms IPO: जिओच्या ‘आयपीओ’ची अवघ्या ३५ मिनिटांत विक्री; सुमारे २० कोटी शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या

रिलायन्सच्या जिओ IPO कडे संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कल; LIC सर्वात मोठा अँकर गुंतवणूकदार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रिजच्या डिजिटल शाखा 'जिओ प्लॅटफॉर्म्स'चा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) बुधवारी (दि. २१) शेअर बाजारात विक्रीसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी सकाळी १० ते १० वाजून ३४ मिनिटांपर्यंत १.०१ पट सबस्क्राईब झाला.

यामध्ये सुमारे १९.९९ कोटी शेअर्ससाठी बोली लावण्यात आली, ज्यांचे मूल्य सुमारे २२,३५४ कोटी रुपये इतके होते. विक्रीसाठी उपलब्ध शेअर्सचे मूल्य २२,०७८ कोटी रुपये होते.

शेअर बाजाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, 'क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स'कडून सर्वाधिक मागणी दिसून आली. त्यांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्याच्या ३.२५ पट बोली लावली. त्याचे मूल्य १७,८०४ कोटी रुपये होते.

या खरेदीदारांसाठी ५,४८४ कोटी रुपयांचे शेअर्स राखीव होते. कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कोट्यापैकी ०.५७ पट सबस्क्रिप्शन मिळाले, तर भागधारक श्रेणीमध्ये ०.४३ पट सबस्क्रिप्शन नोंदवले गेले.

किरकोळ गुंतवणूकदारांच्या श्रेणीत ०.२३ पट सबस्क्रिप्शन मिळाले, तर 'नॉनइन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स'कडून राखीव शेअर्सच्या तुलनेत ०.२६ पट बोली लावण्यात आली.

या श्रेणीमध्ये १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बोलींचे प्रमाण ०.२० पट होते, तर २ ते १० लाख रुपयांच्या श्रेणीतील बोलींचे प्रमाण ०.३६ पट होते. या आयपीओसाठी प्रतिशेअर १,०६५ ते १,११९ रुपयांची किंमत श्रेणी निश्चित करण्यात आली असून, गुंतवणूकदार १२ शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावू शकतात. हा इश्यू सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी बंद होईल. सोमवारी या इश्यूला २१२ अँकर गुंतवणूकदारांकडून ८,१०९.८५ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली होती.

एलआयसीची सर्वाधिक गुंतवणूक

कंपनीने एक्स्चेेंजकडे सादर केलेल्या माहितीनुसार, अँकर गुंतवणूकदारांना १,११९ रुपये प्रतिशेअर या दराने एकूण ७.२५ कोटी शेअर्सचे वाटप करण्यात आले. भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) हे सर्वात मोठे अँकर गुंतवणूकदार होते.

त्यांना ४९९.९८ कोटी रुपये मूल्याचे ४४.६८ लाख शेअर्स देण्यात आले, जे एकूण अँकर भागाच्या ६.१७ टक्के इतके आहे. त्यानंतर 'न्यू वर्ल्ड फंड इंक'चा क्रमांक लागतो. त्यांना ४८६.२७ कोटी रुपये मूल्याचे शेअर्स मिळाले. हे प्रमाण एकूण अँकर भागाच्या ६ टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT