Ramee Group Of Hotels Income Tax Raid
आयकर विभागाने रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सशी (Ramee Group of Hotels) संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत. देशभरातील ३८ ठिकाणांसह एकूण १० शहरांमध्ये सध्या शोधमोहिम सुरू आहे. याशिवाय, वरदराज मंजप्पा शेट्टीयांच्याशी संबंधित ठिकाणांवरही छापे टाकले जात आहेत.
मुंबईतील रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सशी संबंधित ठिकाणांवर आज (दि. २ डिसेंबर) पहाटे आयकर विभागाने धडक कारवाई सुरु केली. ३८ ठिकाणी एकाचवेळी शोध मोहिम राबवली जात आहे. वरदराज मंजप्पा शेट्टी यांच्याशी संबंधित जागेवरही छापे टाकले जात आहेत. करचुकवेगिरी प्रकरणी आयकर विभागाने आज पहाटेपासून मुंबईतील रामी गुप्र हॉटेल्स संबंधित ठिकाणी कारवाई सुरु केली. मुंबईतील दादर परिसरात हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयकर विभागाचे अधिकारी पहाटे हॉटेल ग्रुपची आस्थापनं आणि कार्यालयांमध्ये गेले. येथे त्यांनी आर्थिक व्यवहाराची चौकशी सुरु केली आहे.
रामी ग्रुपचे भारतासह आखाती देशांमध्ये एकूण ५२ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत. या ग्रुपच्या मालकीची 'बॉम्बे अड्डा'सारखी प्रसिद्ध रेस्टॉरंट्स आहेत. ग्रुपच्या मालकीची भारतातील चार आणि पंचतारांकित हॉटेल्स तसेच सिग्नेचर रेस्टॉरंट्स आहेत. संयुक्त अरब अमिराती मधील १०० श्रीमंत भारतीयांमध्ये समाविष्ट असलेले वरदराज मंजप्पा शेट्टी यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकले जात आहेत.आयकर विभागाच्या तपास शाखेने ही कारवाई गोपनीयतेने सुरू केली असून, मुंबईतील अनेक प्रमुख ठिकाणे या कारवाईच्या कक्षेत आहेत.