अण्णामलाई यांनी ‘बॉम्बे’ म्हटल्याने वादंग… पण 'या' ठिकाणांच्या नावांमध्ये अजूनही ‘मुंबई’ नाही! File Photo
मुंबई

अण्णामलाई यांनी ‘बॉम्बे’ म्हटल्याने वादंग… पण 'या' ठिकाणांच्या नावांमध्ये अजूनही ‘मुंबई’ नाही!

भाजप नेते अण्णामलाई यांनी सभेतच ‘मुंबई’ला ‘बॉम्बे’ असे संबोधले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले.

पुढारी वृत्तसेवा

institutions in mumbai use bombay in name including bombay highcourt iit bombay bombay hospital

मुंबई : पुढारी ऑनलाईन

अण्णामलाई यांनी मुंबईला ‘बॉम्बे’ असे संबोधल्यानंतर वाद निर्माण झाला आहे; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याचा आपल्या ठाकरी शैलीत समाचार घेतला. यानंतर भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्‍यारोप सुरू झाले. मात्र मुंबईतील अनेक मोठ्या संस्थांच्या नावांमध्ये आजही ‘बॉम्बे’ या नावाचा वापर केला जातो.

भाजप नेते अण्णामलाई यांनी सभेतच ‘मुंबई’ला ‘बॉम्बे’ असे संबोधले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले. बीएमसी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांनी हा मुद्दा जोरात उचलून धरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनामलाई यांना घेरले. शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांनीही यावर नाराजी व्यक्त करत सांगितले की अण्णामलाई यांनी असे म्हणणे योग्य नव्हते.

अण्णामलाई यांनी नेमके काय म्हटले होते?

खरं तर, अण्णामलाई म्हणाले होते, “केंद्रात मोदीजी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर… कारण बॉम्बे फक्त महाराष्ट्रातील शहर नाही, तर ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५,००० कोटी रुपये आहे, जे काही लहान बजेट नाही.” या दरम्यान त्यांनी मुंबईला ‘बॉम्बे’ असे संबोधले होते.

मुंबई ‘बॉम्बे’वरून ‘मुंबई’ केंव्हा झाली?

माहितीनुसार, ४ मार्च १९९५ रोजी महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे ‘बॉम्बे’ हे नाव बदलून ‘मुंबई’ केले. ‘मुंबई’ हे नाव कोळी समाजाच्या देवी मुंबादेवी यांच्या नावावरून ठेवण्यात आले, कारण कोळी समाज हा मुंबईचा मूळ निवासी आहे. हे नावबदल महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. मात्र, आजही ‘बॉम्बे’ या नावाने मुंबईतील अनेक संस्था ओळखल्या जातात आणि त्यांची ओळख आजही ‘बॉम्बे’ या नावाशीच जोडलेली आहे.

बॉम्बे हायकोर्ट: राज्यातील सर्वात मोठी न्यायिक संस्था असून, गेल्या अनेक वर्षांपासून नाव बदलण्याच्या प्रस्तावांनंतरही अधिकृतपणे ‘मुंबई हायकोर्ट’ असे नाव देण्यात आलेले नाही. आजही ही संस्था ‘बॉम्बे हायकोर्ट’ या नावानेच ओळखली जाते.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE): जगातील सर्वात जुन्या शेअर बाजारांपैकी एक आणि भारताच्या प्रमुख आर्थिक ओळखींपैकी एक असलेल्या या संस्थेचे नाव आजही ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ असेच आहे. याचे नाव अद्याप बदलण्यात आलेले नाही.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (IIT बॉम्बे): याशिवाय राज्यातील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था ‘आयआयटी बॉम्बे’ या अधिकृत नावाने ओळखली जाते. मात्र, महाराष्ट्र सरकार या संस्थेचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की ‘आयआयटी बॉम्बे’चे नाव ‘आयआयटी मुंबई’ करण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत.

बॉम्बे हाऊस: फोर्ट परिसरात स्थित टाटा समूहाचे ऐतिहासिक मुख्यालय, ज्याचे नाव आजपर्यंत बदलण्यात आलेले नाही.

बॉम्बे स्कॉटिश स्कूल: अनेक कॅम्पस असलेली एक नामांकित खासगी शाळा, जी आपल्या औपनिवेशिक काळापासूनच्या वेगळ्या ओळखीमुळे आजही जुन्या नावानेच ओळखली जाते.

बॉम्बे हॉस्पिटल: शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्रासोबतच आरोग्य क्षेत्रातही ‘बॉम्बे’ हे नाव आपली ओळख टिकवून आहे. हे एक प्रसिद्ध मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्र आहे.

बॉम्बे जिमखाना: दक्षिण मुंबईतील एक नामांकित एलिट स्पोर्ट्स आणि सोशल क्लब आहे.

बॉम्बे सॅपर्स: बॉम्बे इंजिनिअर ग्रुप किंवा बॉम्बे सॅपर्स ही भारतीय सेनेच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सची एक रेजिमेंट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT