मुंबई/नवी दिल्ली : देशातील जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल 2026 रोजी सुरू होणार असून, प्रथमच डिजिटल स्वरूपात होणाऱ्या या जनगणनेत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जोडपी आपले संबंध स्थिर असल्याचे मानत असतील तर त्यांना ‘विवाहित’ मानले जाणार आहे.
भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजयकुमार नारायण यांनी सोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात विचारण्यात येणाऱ्या 33 महत्त्वाच्या प्रश्नांची यादी केंद्र सरकारने जाहीर केली आहे. यात घराचा प्रकार, रचना, भिंत-छप्पर-फरशीसाठी वापरलेले साहित्य, घरातील सदस्यांची संख्या, विवाहित जोडप्यांची माहिती, कुटुंबप्रमुखाचे नाव, लिंग, जेवण-खाण्याच्या सवयी, वाहन आणि इतर सुविधांची माहिती समाविष्ट असेल. दुसऱ्या टप्प्यात (फेब्रुवारी 2027) सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, स्थलांतर, प्रजनन क्षमता आणि जातीनिहाय माहिती गोळा केली जाईल. ही देशातील 16 वी जनगणना असून, स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जर एखादे जोडपे लिव्ह-इनमध्ये राहत असून, तसे ते स्वतः त्यांचे संबंध स्थिर असल्याचे मान्य करत असतील तर त्यांची नोंद ‘विवाहित’ म्हणून केली जाईल.
महाराष्ट्रात स्व-नोंदणी प्रक्रिया 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान होईल. त्यानंतर घरांची गणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान पार पडेल. या टप्प्यात घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती गोळा केली जाईल.
या जनगणनेत पहिल्यांदाच स्वगणनेचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक मोबाईल ॲप किंवा वेब पोर्टलवर आपली माहिती घरबसल्या भरू शकतील, ती अशी-
1) पोर्टल ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप (हीींंीि://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप) वर
लॉगिन करा
2) नकाशावर घराचे स्थान चिन्हांकित करा
3) कुटुंबाचे तपशील भरा
4) माहिती सबमिट करा आणि आयडी मिळवा
5) आयडी प्रगणकाला द्या, ते माहिती जनगणनेत समाविष्ट करतील.
(ही सुविधा 16 भाषांमध्ये उपलब्ध असेल.)