High Court file photo
मुंबई

Bombay High Court: पतीला ‘नपुंसक’ म्हणणे बदनामी ठरत नाही- मुंबई हायकोर्ट

Bombay High Court News: घटस्फोटाच्या प्रकरणात हायकोर्टाचा निर्वाळा

पुढारी वृत्तसेवा

Bombay High Court on Defamation to call Husband Impotent

मुंबई : घटस्फोटाच्या याचिकेत किंवा एफआयआरमध्ये पत्नीने पती ’नपुंसक’ असल्याचे म्हटले तर त्याला बदनामी म्हणता येणार नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका घटस्फोटाच्या प्रकरणात दिला. न्या. श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने हा निर्वाळा देताना महिला, तिचा भाऊ आणि वडिलांविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द केला.

पत्नीने तिचा पती नपुंसक असल्याचा आरोप करणे योग्य आहे. हिंदू विवाह याचिकेत नपुंसकतेचे आरोप खूप सर्वसाधारण आहेत. जेव्हा पत्नी नपुंसकतेमुळे पत्नीवर मानसिक क्रूरता निर्माण झाल्याचा आरोप करते, तेव्हा ती निश्चितच तसा आरोप करु शकते. नपुंसकतेचे कारण प्राथमिकदृष्ट्या आवश्यक नसले तरी तो आरोप त्यांच्या वैवाहिक जीवनातील घटनांच्या आधारावर आहे. पोटगीच्या याचिकेमध्येही नपुंसकतेचे आरोप तितकेच संबंधित आहेत, असे निरीक्षण न्या. मोडक यांनी नोंदवले.

पत्नीच्या म्हणण्यानुसार पती शरीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नव्हता. पत्नीने केलेल्या या आरोपामुळे आपली बदनामी झाली, असा दावा करीत पतीने पत्नी, मेहुणा आणि सासर्‍याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता.

  • दंडाधिकारी न्यायालयाने बदनामीची तक्रार फेटाळली होती. मात्र सत्र न्यायालयाने दंडाधिकार्‍यांना पतीच्या याचिकेवर पुनर्विचार करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्या. मोडक यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एफआयआर, घटस्फोट आणि पोटगीच्या याचिकांमध्ये पतीविरुद्ध केलेल्या नपुंसकतेचे आरोप बदनामीकारक मानता येणार नाहीत, असे नमूद करीत न्या. मोडक यांनी सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करून महिला व तिच्या भाऊ, वडिलांना दिलासा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT