मुंबई : कोण हर्षवर्धन सपकाळपासून बिनडोक सपकाळ, इथपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास झालेला असून मला डोके नाही, असे फडणवीस म्हणाले त्याचे आश्चर्य वाटले नाही;
कारण शेकडो वर्षांपासून बुद्धी ही विशेष जातवर्गाची मक्तेदारी आहे, असा त्यांचा समज आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले असल्याचे उत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस यांच्या पोटात होते ते ओठावर आले आहे. याच विचाराने छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला होता, या विचाराने बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवले, असे सांगून ‘गेट वेल सून फडणवीस,’ असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.