मुंबई : मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावरील गोवंडीतील पुलाखाली पार्क केलेल्या वाहनांना गुरुवारी दुपारी लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान. pudhari photo
मुंबई

Govandi car cylinder blast : गोवंडीत कारमधील सिलिंडरचा भीषण स्फोट; 10 वाहने खाक

सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला : मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर गोवंडीतील पुलाखाली पार्किंगमध्ये उभ्या एका कारमधील सीएनजी सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन गुरुवारी दुपारी भडकलेल्या आगीत आठ ते दहा वाहने खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

वाढत्या तापमानात सीएनजीवर धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने समोर आणला आहे. त्याचबरोबर गोवंडीच्या पुलाखाली सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगही या आगीने चर्चेत आणले. गोवंडीच्या पुलाखाली मोठ्या संख्येने रोज गाड्या पार्क होतात. त्यातील एका कारमधील सीएनजी सिलेंडरचा स्फोट होताच भडकलेल्या आगीत आठ ते दहा वाहनांना पाठोपाठ आग लागली.

लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. त्यांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

  • आगीत सापडलेल्या सर्वच गाड्या ओला-उबरवर चालणाऱ्या असून त्यातील काही वाहने नवी होती. परिणामी या वाहनचालकांवर बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT