Goregaon Mulund Link Road Pudhari
मुंबई

Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक प्रकल्प फिल्मसिटीला लाभदायी; २०२९ पर्यंत मुंबई महानगरपालिका २० कोटी ८ लाख रुपये भाडे देणार

प्रकल्पाचे साहित्य ठेवण्यासाठी तीन ठिकाणी सुमारे ३.९ लाख चौरस फूट जमीन; २०२९ पर्यंत भाडे देण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या प्रकल्पामुळे गोरेगाव फिल्मसिटीची करोडो रुपयाची कमाई होणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारे साहित्य ठेवण्याकरीता फिल्मसिटीने भूखंड उपलब्ध करून दिल्यामुळे महापालिका त्यांना प्रकल्प पूर्ण होईपर्यंत म्हणजे २०२९ पर्यंत तब्बल २० कोटी ८ लाख रुपयांचे भाडे देणार आहे.

पश्चिम व पूर्व उपनगर जोडण्यासाठी मुंबई महापालिकेचा गोरेगाव मुलुंड लिंक रोड हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरू आहे. यात फिल्मसिटी गोरेगाव ते खिंडीपाडा अहमदनगर मुलुंड दुहेरी बोगद्याचे काम सुरू आहे.

या कामासाठी फिल्मसिटीची जमीन वापरण्यात येत आहे. तीन ठिकाणी ही जमीन देण्यात आली असून या या जमिनीचे क्षेत्रफळ सुमारे ३ लाख ९० हजार चौरस फूट इतके आहे. प्रतिदिन प्रति चौरस फूट ८ पैसे ते ५२ पैसे भाडे देण्यात येणार आहे.

तीन ठिकाणी दिलेल्या जमिनीचे एकूण भाडे २० कोटी ८ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. प्रत्येक जमीन किती दिवस पालिकेच्या ताब्यात राहणार हे निश्चित करण्यात आले आहे.

सुमारे १ लाख ७२ हजार १६० चौरस फुटाची जमीन १,१४४ दिवस महापालिकेच्या ताब्यात राहणार आहे. त्याशिवाय १ लाख २८ हजार ६०९ चौरस फूट जमीन १३८५ दिवस तर ८८ हजार ५७३ चौरस फुटाची जमीन १,११९ दिवस महापालिकेकडे राहणार आहे.

असे देणार भाडे

टप्पा १

  • जमीन क्षेत्रफळ - १,७२,१६० चौरस फूट

  • प्रतिदिन प्रति चौरस फूट भाडे - ८ पैसे

  • १८४४ दिवस भाडे - २,६०,३१,९६९

टप्पा २

  • जमीन क्षेत्रफळ - १,२८,६०९ चौरस फूट

  • प्रतिदिन प्रति चौरस फूट भाडे - ५२ पैसे

  • १३८५ दिवस भाडे - २,६०,३१,९६९

टप्पा 3

  • जमीन क्षेत्रफळ - १,७२,१६० चौरस फूट

  • प्रतिदिन प्रति चौरस फूट भाडे - ८२ पैसे

  • १८४४ दिवस भाडे - २,६०,३१,९६९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT