Ganesh Utsav Special Trains pudhari
मुंबई

Ganesh Utsav Special Trains: गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेच्या ४२ विशेष फेऱ्या; तिकीट आरक्षण सुरू, कुठे सर्वाधिक फेऱ्या?

Anirudha Sankpal

Ganesh Utsav 2026 Special Trains Ticket Booking: गणेश उत्सव तोंडावर आला असून त्याबाबत पश्चिम रेल्वे देखील कामाला लागलं आहे. पश्चिम रेल्वेने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ४२ विशेष फेऱ्यांची सोय केली असून आजपासून तिकीट आरक्षण सुरू होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने हा मोठा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन ८ विशेष गाड्यांच्या माध्यमातून एकूण ४२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. आज ९ ऑगस्ट २०२६ पासून सकाळी श्र वाजता तिकीट आरक्षण सुरू करण्यात आले आहे. आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच IRCTC च्या संकेतस्थळावरून करता येणार आहे.

मुंबई - सेंट्रल ते सावंतवाडी सर्वाधिक विशेष गाड्यांच्या फेऱ्या

विशेष गाड्या ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध तारखांना धावणार असून मुंबई सेंट्रल–ठोकूर विशेष गाडीच्या २ फेऱ्या, मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या सर्वाधिक १६ फेऱ्या असणार आहेत. तसेच वांद्रे टर्मिनस–रत्नागिरी अनारक्षित विशेष गाडीच्या ४ फेऱ्या असणार आहेत.

याशिवाय वलसाड–रत्नागिरी, उधना–रत्नागिरी, वडोदरा–रत्नागिरी आणि विश्वामित्री–रत्नागिरी मार्गांवरही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांना पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड यांसह विविध स्थानकांवर थांबे असणार आहेत. प्रवाशांच्या गरजेनुसार AC, स्लीपर आणि सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध आहेत. गणेशोत्सवातील कोकण प्रवासासाठी मुंबईकर आणि चाकरमान्यांना अतिरिक्त रेल्वे पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी कडक होणार

मुंबई लोकलमधील विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू केली आहे. तिकीट तपासनीसांची संख्या वाढवण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत दररोज सुमारे 65 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या स्थानकांवर तसेच महत्त्वाच्या मार्गांवर तिकीट तपासणी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार. रेल्वेच्या महसुलात वाढ करण्यासोबतच विनातिकीट प्रवासाला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असल्याने तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता असून मुंबईकरांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट किंवा पास जवळ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT