Liquor Pudhari
मुंबई

FSSAI Liquor Brands Notice: ओल्ड मंक, मॅकडोवेल्ससह अनेक लोकप्रिय ब्रँड अडचणीत; एफएसएसएआयच्या नोटिसांनी खळबळ, नेमकं काय घडलं?

दिशाभूल करणारे लेबलिंग, अनधिकृत फ्‍लेवरचा वापर, सहा कंपन्‍यांना नोटिसा; ‘एफएसएसएआय’च्‍या तपासणीत धक्‍कादायक माहिती उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: फ्लेवरचा वापर, दिशाभूल करणारी लेबलिंग आणि वयाच्या दाव्यांशी संबंधित नियमांचे उल्‍लंघन केल्‍याप्रकरणी भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणने (एफएसएसएआय) अनेक मद्य उत्पादकांवर अंमलबजावणीच्‍या कारवाईचा फास आवळला आहे. प्राधिकरणाने या अनुषंगाने ओल्ड मंक, मॅकडोवेल्स, बॅगपायपर, अँटिक्विटी ब्लू आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडची दारू बनविणार्‍या महाराष्‍ट्रातील सहा कंपन्‍यांना नोटिसा बजावल्‍या आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली. ‘एफएसएसएआय’च्‍या नियमानुसार, सामान्यतः फ्लेवरिंग घटकांच्या वापराबाबत कोणतीही अडचण नाही.

वैध तांत्रिक समर्थन असलेल्‍या उत्‍पादनांना अन्नसुरक्षा नियमांनुसार परवानगी आहे. मात्र काही कंपन्‍या त्‍यांच्‍या उत्‍पादित मद्यात स्‍वत:चा फ्‍लेवर बाहेरून मिसळून ते मद्य ‘स्टँडर्ड अल्कोहोलिक ड्रिंक’ म्‍हणून विक्री करताना आढळल्‍या.

शिवाय बाटल्‍यांच्‍या लेबलवर मिश्रणाचा उल्‍लेख केला जात नव्‍हता. अशी उत्पादने केवळ निकृष्ट दर्जाचीच नाहीत, तर स्टँडर्ड श्रेणींच्या नावांचा वापर करून त्यांची चुकीची माहिती दिली जात आहे.

याप्रकरणी अनेक कंपन्‍यांना नोटिसा बजावण्‍यात आल्‍या असून, यात महाराष्‍ट्रातील सहा कंपन्‍यांचा समावेश आहे. गोव्यातील मॅंडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रेव्‍हरिजमध्येही तपास व सॅम्पलिंग केल्‍याची माहितीही देण्‍यात आली. ही कारवाई संपूर्ण दारू उद्योगाला लागू होत नाही. अनेक उत्पादक ठरवून दिलेल्या मानकांचे पालन करून स्टँडर्ड अल्कोहोलिक पेयांचे उत्पादन करतात, असेही मंत्रालयाने स्‍पष्‍ट केले.

काय आढळले तपासणीत

  • स्टँडर्ड अल्कोहोलिक पेयांत फ्‍लेवर्सचे मिश्रण करून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन.

  • कृत्रिम फ्लेवर्स मिसळून मद्यपेयाच्‍या नैसर्गिक चवीत बदल.

  • न्यूट्रल अल्कोहोल, एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलपासून बनलेली व खरी चव नसलेल्‍या उत्पादनांची स्टँडर्ड रम किंवा व्हिस्की म्हणून विक्री.

  • 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' किंवा 'व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट' असा लेबलवर उल्‍लेख नाही.

  • रमवर ‘७ वर्षे जुने’चे खोटे दावे.

  • जुन्‍या नसलेल्‍या मद्यात न्यूट्रल स्पिरिटचे मिश्रण. मॅच्युर रम स्पिरिटचे प्रमाण ५ टक्‍क्‍यांहूनही कमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT