Namo Sahakar Taxi: 'नमो सहकार टॅक्सी'बाबत प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; चालकांना मिळणार नवे अधिकार?

चालक, मालक, सर्व युनियन आणि प्रवाशांना विश्वासात घेऊनच ‘नमो सहकार टॅक्सी’ वाटचाल करील : आ. प्रवीण दरेकरांची ग्वाही
Namo Sahakar Taxi
Namo Sahakar TaxiPudhari
Published on
Updated on

मुंबई: चालक, मालक, सर्व युनियन आणि प्रवासी या सर्वांना विश्वासात घेऊनच नमो सहकार टॅक्सीची भविष्यातील वाटचाल राहील. नमो सहकार टॅक्सी उपक्रमातील प्रत्येक चालक आणि मालक हा या उपक्रमात भागीदार असेल, त्या माध्यमातून चालकांना सन्मान मिळेल, अशी ग्वाही नमो सहकार टॅक्सीचे प्रणेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

मुंबई बँकेत सोमवारी झालेल्या चालक, मालक, टॅक्सी युनियनच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

या मेळाव्याला मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले, मनसे नेते संदीप देशपांडे, मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे शशांक राव, महाराष्ट्र ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर,महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संजय नाईक, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ बेस ट्रान्सपोर्ट युनियनचे सुनील बोरकर.

Namo Sahakar Taxi
Sanitation Workers: पोलीस ठाण्यांमधील अठराशे हंगामी सफाई कर्मचारी जाणार शासकीय सेवेत

रिझवान शेख, नवनिर्माण रिक्षा, टेम्पो टॅक्सी चालक-मालक संघटनेचे महेश कदम, स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा युनियनचे के.के. तिवारी, भारतीय प्रायव्हेट मजदूर महासंघाचे अविनाश खोत, अण्णा देसाई, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे अभिजीत राणे, मुंबई टॅक्सी असोसिएशनचे प्रेम सिंग, प्रहार जनशक्ती रिक्षा टॅक्सी संघटनेचे दयानंद गायकवाड.

नवी मुंबई रिक्षा चालक-मालक सेवा आदी संस्था व शिव वाहतूक रिक्षा संघटनेचे दिलीप आमले, शिव सहकार सेनेच्या कार्याध्यक्ष आशा मामेडी, शामराव खानविलकर, मुंबई टॅक्सी चालक-मालक सेनेचे दीपक पाटील, भारतीय टॅक्सी चालक संघटनेचे भरत ठोंबरे, महाराष्ट्र शिव कामगार संघटनेचे मनोज वाघमारे, नमो सहकार टॅक्सीचे मुख्य व्यवस्थापक सुदेश रोझेकर, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक संदीप सुर्वे, यांसह युनियनचे पदाधिकारी, चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२२ युनियन एकत्र हेच नमो सहकार टॅक्सीचे यश

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, कष्टाने टॅक्सी चालवणाऱ्या चालकांचे आजपर्यंत खूप आर्थिक शोषण झाले आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांचीही लूट झाली. हे सर्व थांबवण्यासाठी सहकारातून पर्याय निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.

ही टॅक्सी सेवा १०० टक्के सहकारातून चालवली जाईल. नमो सहकार टॅक्सी सेवेकडून अतिशय व्यावसायिक सेवा दिली जाईल.

Namo Sahakar Taxi
Neeta Naik Case: गँगस्टर अश्विन नाईकच्या पत्नीची हत्या कोणी केली? २६ वर्षांनंतरही गूढ कायम

त्याच वेळी सहकाराचे तत्व पाळून चालकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी योजना देखील राबवल्या जातील. चालकांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी, प्रशिक्षण, विमा, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी मार्गदर्शन, नवीन वाहनासाठी कर्ज, व्याज परतावा योजना, अशी आखणी करण्यात आलेली आहे.

ज्या महिलांना या सेवेत यायचे असेल, त्यांच्यासाठी देखील विशेष योजना राबवल्या जाणार आहेत. प्रवाशांना कोणतेही छुपे चार्जेस द्यावे लागणार नसल्यामुळे त्यांचीही लूट थांबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आज पक्षीय मतभेद विसरून, जात, धर्म, पंथ विसरुन नमो सहकार टॅक्सीच्या मंचावर जवळ जवळ २२ युनियन एकत्र आल्या, हेच नमो सहकार टॅक्सीचे यश आहे, आता ही सेवा आपल्या हातात घेऊन जास्तीत जास्त चालक आणि प्रवासी नमो सहकार टॅक्सीशी जोडले जातील, यासाठी प्रयत्न करावा, असेही आवाहन आ. दरेकर यांनी केले.

बैठक सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोन

चालक, मालक, टॅक्सी युनियनचे पदाधिकारी मेळाव्यापूर्वी टॅक्सी युनियनच्या प्रमुख नेत्यांची बैठक प्रवीण दरेकरांनी बोलावली होती, या बैठकीला जवळ जवळ २२ युनियनचे प्रतिनिधी हजर होते. कमिशन, महिलाना संधी, वाहन कर्ज, रेट, सर्जिंग, प्रशिक्षण, आणि कल्याणकारी योजनांवर २ तास मंथन करण्यात आले. आ. दरेकरांनी सर्व प्रश्नांचे समाधान केले. सर्वांना विश्वासात घेण्याचे वचन उपस्थितांना दिले. ही बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दरेकरांना फोन आला. चालकांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याची विनंती दरेकर यांनी केली आणि अशी बैठक लवकरच लावू, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी याच फोनवर दिला.

वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांचाही मेळाव्‍यात फोनवर संवाद

मेळावा सुरू असताना राज्याचे वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांचाही फोन आला आणि त्यांनी फोनवरून नमो सहकार टॅक्सीला आणि चालक, मालक यांना शुभेच्छा दिल्या. सहकारातून अनेक उपक्रम दरेकरांनी यशस्वी करून दाखवले आहेत. नमो सहकार टॅक्सीचा हा उपक्रमही यशस्वी ठरेल, सरकार म्हणून आम्ही पाठीशी आहोत, अशी प्रतिक्रियासरनाईक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news