Sanitation Workers: पोलीस ठाण्यांमधील अठराशे हंगामी सफाई कर्मचारी जाणार शासकीय सेवेत

मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांकडे प्रस्ताव; लवकरच निर्णयाची शक्यता
Sanitation Workers
Sanitation WorkersPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये अनेक वर्षांपासून हंगामी तत्त्वावर कार्यरत असलेल्या सुमारे १ हजार ८०० सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या स्तरावर बैठका सुरू आहेत.

पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून अत्यल्प मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांची कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी प्रलंबित असून यासाठी गृह राज्यमंत्री योगेश कदम पाठपुरावा करत आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती गृह विभागातील अधिकाऱ्याने दिली.

Sanitation Workers
Neeta Naik Case: गँगस्टर अश्विन नाईकच्या पत्नीची हत्या कोणी केली? २६ वर्षांनंतरही गूढ कायम

गृह विभागाने यासंदर्भातील प्रस्ताव अंतिम टप्प्यात नेल्याचे समजते. या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतल्यास त्यांना नियमित वेतन, सेवा सुरक्षा तसेच इतर शासकीय लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

अनेक कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकरभरतीची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news