Fraud Case  pudhari photo
मुंबई

Forex trading fraud : फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली 4 जणांची 23 लाखांची फसवणूक

आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तुर्भे पोलिसांनी केले

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास कमी कालावधीत चौपट पाचपट परतावा मिळतो, असे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत चार जणांची तब्बल 23 लाख 14 हजार 100 रुपयांची फसवणूक केली आहे. या आरोपीने आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तुर्भे पोलिसांनी केले आहे.

समीर जावेद शेख असे यातील आरोपीचे नाव असून तो तुर्भे परिसरात राहतो. त्याने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवल्यास महिनाभरात दुप्पट चौपट परतावा मिळतो असे अमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून साईराज जाधव यांच्याकडून 7 लाख, करण जाधव यांच्याकडून 4 लाख 50 हजार, सुधीर जाधव यांच्याकडून 6 लाख 50 हजार विकी मेढेकर यांच्याकडून 5 लाख 14 हजार 100 रुपये असे एकूण 23 लाख 14 हजार 100 रुपये घेतले होते.

ही रक्कम ऑनलाईन आणि रोख स्वरूपात त्याने स्वीकारली होती. मात्र ही रक्कम अद्याप न दिल्याने फिर्यादी यांनी त्याच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी समीर याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT