आता विनाभुर्दंड विमान तिकीट रद्द होणार pudhari photo
मुंबई

Air travel refund rules : आता विनाभुर्दंड विमान तिकीट रद्द होणार

डीजीसीए ः तिकीट आरक्षणानंतर 48 तासांत केलेल्या बदलाला शुल्कमाफी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः विमानाचे तिकीट आरक्षित केल्यानंतर 48 तासांत ते रद्द केल्यास अथवा प्रवास वेळेत बदल केल्यास त्यासाठी कोणताही भुर्दंड पडणार नाही. तिकीट आरक्षण करताना नावात झालेली चूक 24 तासांत लक्षात आणून दिल्यास त्यात विनाशुल्क सुधारणा केली जाईल. मात्र तिकीट आरक्षण केल्यापासून 48 तासांनंतर ही सुविधा उपलब्ध असणार नाही. प्रवाशांना नियमानुसार तिकीट रद्द केल्याचे आणि सुधारणा करण्याचे शुल्क मोजावे लागेल.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) हे ग्राहककेंद्री बदल केले आहेत. आरक्षण करताना नावात चूक झाल्यास प्रवाशांनी ती 24 तासांत निदर्शनास आणून दिल्यास त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यासाठी तिकीट विमान कंपनीच्या संकेतस्थळावरून आरक्षित केलेले हवे.

तिकीट एखाद्या एजंटकडून खरेदी केले असल्यास प्रवाशांना मिळणारा तिकिटाचा परतावा 14 कार्यालयीन दिवसांत मिळाला पाहिजे, असेही डीजीसीएने स्पष्ट केले आहे. तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना वेळेत परतावा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी डीजीसीएकडे दाखल झाल्या होत्या. विशेषतः डिसेंबर महिन्यात इंडिगोची सेवा कोलमडल्यानंतर हा प्रश्न प्रकर्षाने जाणवला.

वैद्यकीय आणीबाणीत परतावा मिळणार

डीजीसीएच्या मते, वैद्यकीय आणीबाणीमुळे तिकीट रद्द झाल्यास प्रवासादरम्यान त्याच पीएनआरमध्ये सूचिबद्ध असलेल्या प्रवाशाला किंवा कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल केले असल्यास विमान कंपन्या परतावा किंवा क्रेडिट शेल देऊ शकतात. इतर सर्व परिस्थितींसाठी, एअरलाईनच्या एरोस्पेस मेडिसिन स्पेशालिस्ट, डीजीसीएच्या पॅनलवर असलेल्या एरोस्पेस मेडिसिन स्पेशालिस्टकडून प्रवाशांच्या फिटनेस टू ट्रॅव्हल सर्टिफिकेटबद्दल मत प्राप्त झाल्यानंतर परतफेड केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT