Skincare Pudhari
मुंबई

Fake Cosmetics: भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा भडिमार; संपूर्ण आरोग्यावर थेट वार

फेअरनेस क्रीम, लिपस्टिक, फेस पावडर, हेअर डाई, काजळ, नेलपॉलिशमध्ये घातक रसायनांचा वापर

पुढारी वृत्तसेवा

अदिती कदम

मुंबई: बाजारात स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या भेसळयुक्त आणि बनावट सौंदर्यप्रसाधनांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. फेअरनेस क्रीम, लिपस्टिक, फेस पावडर, हेअर डाई, काजळ, नेलपॉलिश आणि इतर सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा, शिसे, स्टिरॉइड, हायड्रोक्चिनोन, पीपीडी यांसारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याचे विविध तपासण्यांत आढळून आले. याचा थेट परिणाम होतो.

रसायनांमुळे त्वचेची ऍलर्जी, पुरळ, खाज, त्वचा पातळ होणे, डोळ्यांची जळजळ, केस गळणे, श्वसनाचे विकार तसेच दीर्घकाळ वापर केल्यास किडनी, यकृत आणि मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

गर्भवती महिलांनी अशा उत्पादनांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. बचावासाठी ग्राहकांनी केवळ विश्वासार्ह कंपनीची सीलबंद उत्पादने खरेदी करावीत, उत्पादनावरील घटक, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख तपासावी व नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी.

स्वस्त किंवा संशयास्पद ठिकाणी विक्री होणारी उत्पादने टाळण्याचे आवाहन जेजे हॉस्पिटल औषधवैद्यकशास्त्र विभाग पथकप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'पुढारी'शी बोलताना केले आहे.

1. फेअरनेस क्रीम हानिकारक घटक : पारा, स्टिरॉइड, हायड्रोक्चिनोन

संभाव्य आजार : त्वचा काळी पडणे, कॅन्सर, किडनी खराब, गर्भावर परिणाम

2. लिपस्टिक हानिकारक घटक : शिसे, कृत्रिम रंग

संभाव्य आजार : ओठ काळे पडणे, मेंदूवर परिणाम, हार्मोनल गडबड

3. फेस पावडर/फाऊंडेशन हानिकारक घटक : टॅल्क, एस्बेस्टॉस, जड धातू

संभाव्य आजार : श्वासाचे आजार, त्वचेचा कॅन्सर, ऍलर्जी

4. हेअर कलर हानिकारक घटक : पीपीडी -फेनिलीनडायामाईन, अमोनिया

संभाव्य आजार : केस गळणे, त्वचेची जळजळ, अंधत्वाचा धोका, कॅन्सर

5. आयलायनर/काजळ हानिकारक घटक : शिसे, कार्बन, कोलतार

संभाव्य आजार : डोळे लाल होणे, दृष्टी कमजोर, संसर्ग

6. साबण/फेसवॉश हानिकारक घटक : कृत्रिम सुगंध, एसएलएस, पॅराबेन

संभाव्य आजार : त्वचा कोरडी होणे, खाज, हार्मोनल असंतुलन

7. नेलपॉलिश हानिकारक घटक : टोल्यूईन, फॉर्मल्डिहाइड

संभाव्य आजार : डोकेदुखी, चक्कर, लिव्हर व किडनी खराब

8. सनस्क्रीन हानिकारक घटक : ऑक्सीबेन्झोन, कृत्रिम रंग SCREEN SUN

संभाव्य आजार : त्वचा जळजळ, ऍलर्जी, कॅन्सरचा धोका

भेसळयुक्त कॉस्मेटिक्सचे मोठे दुष्परिणाम

त्वचेचे आजार : पुरळ, खाज, काळे डाग, अकाली वृद्धत्व, त्वचेचा कॅन्सर

डोळे आणि दृष्टी : जळजळ, पाणी येणे, काचबिंद, अंधत्वाचा धोका

केसांचे नुकसान : केस गळणे, कोंडा, टक्कल, स्कॅल्पला जखमा

अंतर्गत अवयव खराब : पारा आणि शिसे किडनी, लिव्हर आणि मेंदूला हानी पोहोचवतात

हार्मोनल गडबड : पॅराबेन आणि स्टिरॉइडमुळे महिलांमध्ये पीसीओडी, वंध्यत्वाचा धोका श्वसनाचे आजार : पावडर आणि स्प्रे श्वासात गेल्याने दमा, अॅलर्जी

गर्भवती महिलांसाठी धोका : पारा, शिसे बाळाच्या वाढीवर वाईट परिणाम करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT