Chhatrapati Shivaji Maharaj: मराठीचा जागतिक विस्तार! लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराज मराठी संवर्धन केंद्र

मराठीच्या संवर्धनाचा कृती आराखडा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on
Updated on

मुंबई: मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय राज्य मराठी विकास संस्थेच्या बैठकीत घेताना लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराज मराठी संवर्धन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विकासमंत्री उदय सामंत यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या बैठकीत संवर्धनाला गती देणारे निर्णय घेतले.

बोली भाषांच्या विकासासाठी विशेष निधी देणे तसेच पुस्तकांचे गाव ही संकल्पना प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचनपेटीतून गावोगावी विशेषतः आदिवासी पाड्यावर पुस्तके दिली जातात. या योजनांवर लक्ष देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

झाडीबोली नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्य संकुल उभारणे, भारूड, गोंधळ, पोवाडा यासारख्या लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली .

Devendra Fadnavis
Vocational Teachers: व्यवसाय शिक्षकांना हायकोर्टाचा दिलासा; ८०० हून अधिक शिक्षकांना योजना सुरू असेपर्यंत सेवेत कायम ठेवा

तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाच्या प्रगतीचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.

मराठीचा जागतिकस्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारले जात आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज यांच्या नावाने अध्यासन केंद्र स्थापन झाले आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला, त्या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

Devendra Fadnavis
Mumbai Police: बॉम्बच्या बनावट धमक्यांच्या शोध तपासात पोलिसांना अडथळे

भारतीय तसेच जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ‘अनुवाद समिती’ स्थापन करण्यात येणार आहे.

मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भाषा संचालक अरुण गीते तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे सदस्य बैठकीस उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news