Eknath Shinde On Manoj Jarange:
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत माध्यमांशी प्रतिक्रिया देताना राज्यातील अनेक मुद्द्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही हीच आपली भूमिका कायम ठेवली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यावर देखील उपमुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.
एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाबाबत बोलताना म्हणाले की, 'आमची आरक्षण देताना ओबीसी किंवा कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका ठेवून मराठा समाजाचे आरक्षण देण्याचे काम केले. त्यांचे जे मुद्दे आले ते सोडवण्याचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले की काही प्रकरणे न्या प्रविष्ट आहेत. सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. कुठल्याही समाजावर अन्याय झाला नाही पाहिजे.
मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये उपोषण सुरू ठेवण्यासाठी निघाले आहेत. त्याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गणेश उत्सव आहे. कुठलेही विघ्न येऊ नये ही सरकारची भूमिका आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील समजुदारीची भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाचे अनेक मोर्चे झाले मात्र कोणत्याही समाजाला त्रास झाला नाही.
एकनाथ शिंदे यांना मनोज जरांगेंच्या भाषेबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी टीका करण्याचा, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. समाजाला न्याय देण्यासाठी कुठलीही राजकीय भूमिका घेता कामा नये. समाज हिताची लाईन सोडून राजकीय हिताची लाईन नसावी.
ते पुढे म्हणाले की, आम्ही कायदेशीर चौकटीत बसून मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सरकार सकारात्मक आहे. जे जे करता येईल ते सरकारने केले आहे. आंदोलनाच्या आडून कोणी राजकीय पोळी भाजून घेऊ नये.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सरकार पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत आहे. ज्याचा हक्क आहे त्याला तो मिळणार असं वक्तव्य त्यांनी केलं. तसेच त्यांनी दिंहू सन आहे महाराष्ट्रातील भक्त मुंबऊत येतात. मुंबई आहे लाखो भक्त आहेत कोणामुळं कोणाला त्रास होऊ नये. सरकार सकारात्मक आहे आंदोलकांनी देखील सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.