Eknath Shinde Pudhari
मुंबई

Eknath Shinde: दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील लग्‍नात शिवसेना करणार खर्च; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुला-मुलींचे लग्न ठरलेल्या कुटुंबांनी स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: दुष्काळग्रस्त भागासाठी सरकारने उपाययोजना घोषित करण्यास प्रारंभ केला असतानाच शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी तिजोरीवर पहिला हक्क सरकारचा असल्याचे जाहीर केले. ज्या शेतकरी कुटुंबात मुला-मुलींचे लग्न ठरलेली आहेत, त्यांच्या विवाहखर्चाला शिवसेना हातभार लावेल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.

दुष्काळी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची लग्न ठरली आहेत. त्यांनी शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांना आवश्यक ती मदत शिवसेनेच्या माध्यमातून केली जाईल, असे शिंदे यांनी जाहीर केले आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकरी नाईलाजाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. विवाहात होणारा खर्च हा शेतकऱ्यांमागचा मोठा ताप असतो, हे लक्षात घेत ही घोषणा करण्यात आली.

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यात मुला मुलींच्या लग्नाचा खर्च कसा करायचा याची विवंचना त्यांना कायम सतावत असते.

दुष्काळ, नापिकी, कर्ज यामुळे मुलांच्या लग्नासाठी पैसे उभे करता येणे शक्य नसल्याने अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यांना त्या निर्णयापासून परावृत्त करून याबाबत चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT