Arrested Pudhari
मुंबई

DRI Anti Dumping Duty Case: चीनचा माल मलेशियाचा दाखवून ४.७७ कोटींची शुल्क चुकवेगिरी; डीआरआयने केली कारवाई

कंपनीच्या भागीदाराला अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: चीनमधून आणलेल्या रसायन पदार्थाचा उगम मलेशियाचा असल्याचे भासवून ४ कोटी ७७ लाख रुपयांचे अँटी-डम्पिंग शुल्क चुकवल्याचा प्रकार महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)उघडकीस आणला आहे. या प्रकरणात डीआरआयने बंगळुरू येथील एका कंपनीच्या भागीदाराला अटक केली आहे.

चीनमध्ये तयार होणाऱ्या ट्रायक्लोरोआयसोसायन्युरिक अ‍ॅसिड या रसायनावर भारताने अँटी-डम्पिंग शुल्क लागू केले आहे. हे शुल्क टाळण्यासाठी संबंधित कंपनीने मलेशियातील एका कंपनीमार्फत टीसीसीए भारतात मागवल्याचा आरोप आहे.

डीआरआयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. ज्या मलेशियन कंपनीकडून हा माल भारतात आणला जात होता, ती कंपनी रसायन तयार करणारी नसून धातूच्या वस्तूंचा व्यवसाय करणारी कंपनी असल्याचे आढळले. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात टीसीसीए चीनमध्ये तयार झाले होते.

चीनमधून हा माल मलेशियात पाठवण्यात आला आणि त्यानंतर मलेशियातून भारतात आणताना मालाचा उगम मलेशिया असल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे चीनमधील मालावर लागू होणारे अँटी-डम्पिंग शुल्क टाळण्यात आल्याचा आरोप आहे. मार्च २०२५मध्ये चीनमधून येणाऱ्या टीसीसीएवर अँटी-डम्पिंग शुल्क लागू झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT