मुंबई

मुंबई: मढ येथे कुत्र्यांचे हल्ल्याचे सत्र सुरूच: चिमुकलीचा घेतला चावा

अविनाश सुतार

मालाड, पुढारी वृत्तसेवा: मालाड पश्चिमेतील मढ येथील कोळीवाड्यात भटक्या कुत्र्याने शनिवारी एका दहा वर्षाच्या मुलाचा चावा घेतला होता. ही घटना ताजी असतानाच आज (दि.२८) आणखी एका ७ वर्षीय चिमुकलीचा कुत्र्याने चावा घेतला. राजवी दत्ता कोळी असे चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

चिमुकली आज घरातून बाहेर पडल्यानंतर गल्लीत असलेल्या भटक्या कुत्र्याने तिच्या अंगावर धाव घेतली. ती घाबरून पळाली, मात्र त्या आधीच भटक्या कुत्र्याने तिचा चावा घेतला. सुदैवाने तिथे असलेले जॉनी जांभळे आणि नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून लावल्याने मोठी दुर्घटना टळली.

दोन दिवसांत दोन घटना घडल्याने मढ परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. तसेच ऑल इंडिया फिशरमेन्स काँग्रेसचे महासचिव संतोष कोळी यांनी याबाबत महापालिकेचे विभागीय सहायक आयुक्त किरण दिघावकर यांना पत्र लिहून उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT